मुंबई पालिका निवडणूक आम्ही नाही, ठाकरेंच्या पक्षानेच अडवलीय; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:11 PM2023-07-03T19:11:38+5:302023-07-03T19:14:05+5:30
कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर घोटाळा, ३५ डॉक्टरांना मेल केला जातो, त्यांना कधीच सेवेत घेतले नाही. त्यांना पगार जात होता. याची चौकशी केलीच पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलीस अधिकारी लोकांची सेवा करतात असे समजले जात होते. परंतू ते राजकारण्याची सेवा करतात असे प्रकाश म्हणाल्या. यावर फडणवीसांनी मी कधीही पोलिसांचा वापर केला नाही. मी कोणारा लक्ष्य करत नाही. परंतू, जर कोर्टाने सांगितले की तुम्ही याची चौकशी करा, तक्रारी येतील, पुरावे येतील तिथे मला करावेच लागणार आहे. कोरोना काळात जम्बो कोविड सेंटर घोटाळा, ३५ डॉक्टरांना मेल केला जातो, त्यांना कधीच सेवेत घेतले नाही. त्यांना पगार जात होता. याची चौकशी केलीच पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावर या चौकशा सीबीआय, ईडी आदींकडे जातात पण कोणी सापडत नाही, असा सवाल प्रकाश यांनी केला. यावर आपली सिस्टिम वेळखाऊ आहे. सरकार कोर्टाला हे ठरवावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधींवर एका जजने खटला चालवावा, एका वर्षात निकाल लावावा, पण ते पाळले जात नाहीय. लालूंचा चारा घोटाळा किती वर्षांनी निकाल आला, असे फडणवीस म्हणाले.
बीएमसी निवडणूक कधी होणार, खूप उशिर केला आहे, असा सवाल प्रकाश यांनी केला. यावर फडणवीस यांनी आम्हालाही लवकर निवडणुका हव्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्या आहेत. यात आरक्षणाचीही आहे. कोर्टाने या सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि एक स्टेटस को दिला आहे. यामुळे निवडणुका होऊ शकत नाहीएत. जेव्हा कोर्ट ते हटवेल तेव्हा या निवडणुका होतील. हास्यास्पद असे की उद्धव ठाकरे आम्हालाच विचारत आहेत. तुम्हीच याचिका दाखल केल्यात तर तुम्हीच काढून घ्या, दुटप्पीपणा कशाला करताय, असा सवाल फडणवीस यांनी केला. ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत यावर निकाल येईल त्यानंतर निवडणूक लागेल असे ते म्हणाले. आम्ही शिवसेनेसोबत निवडणूक लढविणार आहोत, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली तर स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल. काही जागांवर एकत्र आले तर आम्हाला फायदा होईल, अशा जागांवर ते वेगवेगळे लढतील असे फडणवीस म्हणाले. मुंबई आम्ही १०० टक्के जिंकणार आहोत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.