मुंबईत उरलेत फक्त ६९ खड्डे, पालिका प्रशासनाचा दावा
By admin | Published: July 15, 2016 07:53 PM2016-07-15T19:53:01+5:302016-07-15T19:53:01+5:30
मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या तक्रारींचे प्रमाण निम्म्यावर आले असल्याचा दाखला पालिका अधिकारी देत आहेत. मात्र खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ होत असल्याने मुंबईत फक्त ६९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जात असते़ खड्डे चकाचक करण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्यानंतरही यावर्षी मुंबईकरांना खड्ड्यांतूनच वाट काढावी लागत आहे़ तरीही मुंबईत केवळ ६६ खड्डे असल्याचा दावा आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या महासभेत केला होता़ याचे तीव्र पडसाद उमटून राजकीय पक्षांनी आंदोलनच छेडले़ विरोधी पक्षासह महापालिकेत सत्तेवर भागिदारीत असलेल्या भाजपानेही मुंबईत खड्ड्यांची माहिती छायाचित्रांसह आयुक्तांना सादर केली़ मात्र आजही पालिका प्रशासन आपल्या मतावर ठाम आहे़ मुंबईत गुरुवारपर्यंत ९७७ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या़ यापैकी ९०८ खड्ड्े बुजविण्याचे काम सुरु झाले़ उर्वरित ६९ खड्डे लवकरच बुजविण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ प्रतिनिधी चौकट आजचे खड्डे * खड्ड्यांच्या तक्रारी ९७७, खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु ९०८, शिल्लक खड्डे ६९़़ग़ेल्यावर्षी याच तारखेला मुंबईत १७८१ खड्डे होते़ यापैकी २३९ खड्डे बुजविणे शिल्लक होते़ सर्वाधिक खड्ड्यात गेलेले वॉर्ड * कुर्ला विभाग सर्वाधिक खड्ड्यात असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे़ ११२ तक्रारी या विभागातून आल्या आहेत़ त्यापाठोपाठ चेंबूर, मानखुर्द, गोवंडीचाही समावेश आहे़ * प्रभादेवी, वरळी अशा दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांबरोबरच कुलाबा, चर्चगेट, फोर्ट, सीएसटी अशा अति महत्वाच्या विभागातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ येथील रस्त्यांवर ५८ खड्डे असल्याच्या तक्रारी आज दाखल झाल्या़ * पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ पश्चिमेकडील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ एकूण ७० खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत़ यापैकी १५ खड्डे बुजविणे शिल्लक आहे़ विभाग खड्ड्यांची संख्या शिल्लक खड्डे शहर ३६९ १६ पश्चिम उपनगर३०५ ३६ पूर्व उपनगर३०३ १७ एकूण ९७७ ६९ काँग्रेसची पॉटहोल दिंडी खड्ड्यांवर आतापर्यंत अनेक राजकीय आंदोलन झाली़ यामध्ये आज पॉटहोल दिंडीची भर पडली़ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर काँग्रेसमार्फत ेफॅशन स्ट्रीट ते मुंबइ महापालिका मुख्यालयापर्यंत पॉटहोल दिंडी आज काढण्यात आली. शिवसेना भाजपाने रस्ते दुरुस्त करावेत नाहीतर सत्ता सोडून निघून जावे. युतीच्या नेत्यांना विठ्ठलाने सबुद्धी देण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी भजन, कीर्तन करीत दिंडी काढण्यात आली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले़ या आंदोलनानंतर येत्या १५ दिवसांत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक विभाग कार्यालयावर धडकणार आहेत़ उरलेत फक्त ६९ खड्डे़़़पालिका प्रशासनाचा दावा मुंबई मुसळधार पावसाने मुंबईतील खड्ड्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत़ गतवर्षीच्या तुलनेत या तक्रारींचे प्रमाण निम्म्यावर आले असल्याचा दाखला पालिका अधिकारी देत आहेत़ मात्र खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ होत असल्याने मुंबईत फक्त ६९ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने केला आहे़ दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जात असते़ खड्डे चकाचक करण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्यानंतरही यावर्षी मुंबईकरांना खड्ड्यांतूनच वाट काढावी लागत आहे़ तरीही मुंबईत केवळ ६६ खड्डे असल्याचा दावा आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या महासभेत केला होता़ याचे तीव्र पडसाद उमटून राजकीय पक्षांनी आंदोलनच छेडले़ विरोधी पक्षासह महापालिकेत सत्तेवर भागिदारीत असलेल्या भाजपानेही मुंबईत खड्ड्यांची माहिती छायाचित्रांसह आयुक्तांना सादर केली़ मात्र आजही पालिका प्रशासन आपल्या मतावर ठाम आहे़ मुंबईत गुरुवारपर्यंत ९७७ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या़ यापैकी ९०८ खड्ड्े बुजविण्याचे काम सुरु झाले़ उर्वरित ६९ खड्डे लवकरच बुजविण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ प्रतिनिधी चौकट आजचे खड्डे * खड्ड्यांच्या तक्रारी ९७७, खड्डे बुजविण्याची प्रक्रिया सुरु ९०८, शिल्लक खड्डे ६९़़ग़ेल्यावर्षी याच तारखेला मुंबईत १७८१ खड्डे होते़ यापैकी २३९ खड्डे बुजविणे शिल्लक होते़ सर्वाधिक खड्ड्यात गेलेले वॉर्ड * कुर्ला विभाग सर्वाधिक खड्ड्यात असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे़ ११२ तक्रारी या विभागातून आल्या आहेत़ त्यापाठोपाठ चेंबूर, मानखुर्द, गोवंडीचाही समावेश आहे़ * प्रभादेवी, वरळी अशा दक्षिण मध्य मुंबईतील रस्त्यांबरोबरच कुलाबा, चर्चगेट, फोर्ट, सीएसटी अशा अति महत्वाच्या विभागातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ येथील रस्त्यांवर ५८ खड्डे असल्याच्या तक्रारी आज दाखल झाल्या़ * पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ पश्चिमेकडील रस्ते सर्वाधिक खड्ड्यात आहेत़ एकूण ७० खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत़ यापैकी १५ खड्डे बुजविणे शिल्लक आहे़ विभाग खड्ड्यांची संख्या शिल्लक खड्डे शहर ३६९ १६ पश्चिम उपनगर३०५ ३६ पूर्व उपनगर३०३ १७ एकूण ९७७ ६९ काँग्रेसची पॉटहोल दिंडी खड्ड्यांवर आतापर्यंत अनेक राजकीय आंदोलन झाली़ यामध्ये आज पॉटहोल दिंडीची भर पडली़ आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर काँग्रेसमार्फत ेफॅशन स्ट्रीट ते मुंबइ महापालिका मुख्यालयापर्यंत पॉटहोल दिंडी आज काढण्यात आली. शिवसेना भाजपाने रस्ते दुरुस्त करावेत नाहीतर सत्ता सोडून निघून जावे. युतीच्या नेत्यांना विठ्ठलाने सबुद्धी देण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी भजन, कीर्तन करीत दिंडी काढण्यात आली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले़ या आंदोलनानंतर येत्या १५ दिवसांत काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक विभाग कार्यालयावर धडकणार आहेत़