पोलीस पदकांत मुंबईने मारली बाजी
By admin | Published: April 19, 2015 02:05 AM2015-04-19T02:05:38+5:302015-04-19T02:05:38+5:30
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २२९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविले जाणार आहे़
उल्लेखनीय सेवेचा सन्मान
यवतमाळ : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २२९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविले जाणार आहे़
पोलीस पदक मिळवणाऱ्यांमध्ये विदर्भातील ५५, तर मुंबईतील ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़ प्रशंसनीय सेवा, दरोडेखोर व गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध कारवाई, सेवेत सतत १५ वर्षे उत्तम अभिलेख, विशेष शाखेत उत्तम कामगिरी, पोलिसांची प्रतिमा उजळ करणे, आपत्तीवेळी मदत, राष्ट्रीयस्तरावरील खेळात प्रावीण्य दाखविणे आदींसाठी हा सन्मान करण्यात येतो. पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. या यादीत कार्यकारी पोलीस दलासह साईड ब्रँच व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)