खिल्ली उडवणा-या डेंची मुंबई पोलिसांनी काढली शोभा
By admin | Published: February 22, 2017 01:05 PM2017-02-22T13:05:59+5:302017-02-22T13:09:03+5:30
लेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणा-या ट्विटला मुंबई पोलिसांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - लेखिका शोभा डे यांनी मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणा-या ट्विटला मुंबई पोलिसांनी जशास तसे उत्तर दिले आहे. निरनिराळ्या विषयांवर ट्विट करुन वाद निर्माण करण्यासाठी शोभा डे प्रसिद्ध आहेत.
मंगळवारी मतदान केल्यानंतर शोभा डे यांनी पोट सुटलेल्या एका जाडजुड पोलिसाचा फोटो ट्विटवर पोस्ट केला. त्यावर 'Heavy Police Bandobast In mumbai today', असे पोलिसांची खिल्ली उडवणारे कॅप्शनही टाकले. यानंतर सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला.
या ट्विटची माहिती पोलिसांनी समजली. काहीही संबंध नसलेला फोटो ट्विट करुन शोभा डे मुंबई पोलिसांची बदनामी करत असल्याने त्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रत्युत्तर देऊन शोभा डेंची बोलतीच बंद केली.
'मस्करी करायला आम्हालाही आवडते. गणवेशासहीत फोटोतील पोलीस कर्मचारी आमचा नाही. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहे', असा टोला मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना हाणला आहे.
We love puns too Ms De but this one is totally imisplaced. Uniform/official not ours. We expect better from responsible citizens like you. https://t.co/OcKOoHO5bX
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 21, 2017