संकटग्रस्त महिलांच्या मदतीस अवघ्या ७ मिनिटांत पोहोचणार मुंबई पोलिस
By admin | Published: April 14, 2016 02:02 PM2016-04-14T14:02:10+5:302016-04-14T14:05:38+5:30
बई पोलिसांकडून लवकरच 'प्रतिसाद' हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येत असून त्याद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना अद्याप कायम असून भारताची आर्थिक राजधानी मुंबईही याला अपवाद नाही. त्याच पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार व पोलिसांकडून जास्तीत प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलिसांकडून लवकरच 'प्रतिसाद' हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील.
या अॅपची मूळ कल्पना राज्याचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण दिक्षित यांना सुचली असून येत्या सोमवारी हे अॅप लाँच करण्यात येणार आहे. ' महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये हे अॅप यापूर्वीच लाँच करण्यात आले होते आणि पुढील आठवड्यात ते मुंबईत येईल. मुंबईप्रमाणचे संपूर्ण राज्यात हे अॅप लाँच करून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल' असे दीक्षित यांनी सांगितले.
दरम्यन 'प्रतिसाद' या अॅपपूर्वी पोलिस विभागातर्फेच ' इन केस ऑफ इमर्जन्सी' ( ICE) हे अॅपही आणण्यात आले होते. डिसेंबर २०१२ मध्ये राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या नृशंस बलात्कारानंतर लागलीच जानेवारी २०१३मध्ये हे (ICE) अॅप लाँच करण्यात आले होते, मात्र त्यात ब-याचशी त्रुटी असल्याने ते नागरिकांपर्यंत पोचण्याच अयशस्वी ठरले.
मात्र हे नवे अॅप (प्रतिसाद) हे अचूक असून त्याद्वारे संकटात सापडलेल्या महिलेचे नेमके ठिकाण तसेच तिथपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा व कमी कालावधीचा मार्गही दर्शवेल. मात्र असे असले तरी या अॅपमध्येही अद्याप काही त्रुटी असून त्या दूर करूनच ते लाँच करण्यात येईल.
कसे काम करेल हे अॅप :
- संकटात या अॅपचा फायदा व्हावा व पोलिसांची मदत मिळावी यासाठी प्रथम हे अॅप डाऊनलोड करून त्यावर स्व:तचे नाव व माहिती रजिस्टर करावी लागेल. प्रत्येक अकांऊटची पोलिसांतर्फे तपासणी करण्यात येईल.
- हे अॅप वापरताना युझर्सना मोबाईलवरील जीपीएस सुविधा सुरू ठेवावी लागेल.
- जर एखादी महिला संकटात असेल तर तिला या अॅपवरील इमर्जन्सी ऑयकॉन (बटण) दाबावे लागेल. त्यानंतर त्या परिसरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या पोलिस स्थानकांमधील कमीत कमी १० पोलिसांना तसेच वरिष्ठ पोलिस अधिका-यांनाही एक मेसेज मिळेल, ज्याद्वारे त्यांना संकटाची माहिती मिळेल.
- तसेच एक मेसेज पोलिस कंट्रोल रूमला पाठवण्यात येईव.
- हे अॅप त्या महिलेचे नेमके ठिकाण व तिथपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग दाखवेल.
- मेसेज मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात असलेला कोणताही पोलिस अधिकारी ती रिक्वेस्ट स्वीकारून त्या महिलेच्या महृदतीसाठी रवाना होीलव.
- तसेच पोलिसांच्या सर्व हालचालींवर कंट्रोल रूममधूव लक्ष ठेवण्यात येईव व त्या महिलेलाही घडामोडींची योग्य माहिती मिळेल.