मुंबई पोलिसांची सातारा जिल्ह्यातील बंद घरे फोडली!
By admin | Published: July 23, 2016 04:19 AM2016-07-23T04:19:29+5:302016-07-23T04:19:29+5:30
वाई तालुक्यातील बोपेगाव येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुलूपबंद असलेली अकरा घरे फोडली.
कवठे (ता. वाई, जि. सातारा) : वाई तालुक्यातील बोपेगाव येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत कुलूपबंद असलेली अकरा घरे फोडली. यातील सात घरे मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहेत. चोरलेली रक्कम आणि ऐवज यांबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
घरमालक राजेंद्र तसेच आनंदराव जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव हे सुद्धा मुंबई पोलीस दलात अधिकारी आहेत. संजय जाधव, कैलास कीदर्२त, सुभाष कीर्दत, सुधीर जाधव, बाळासाहेब जाधव व हेमंत तरडे हेही सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत.
आनंदराव जाधव यांच्या घरी रक्ताचे डाग तसेच इतर घरांच्या आसपास चोरीसाठी वापरलेला टिकाव व चपला आढळून आल्या आहेत.
घरातील कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. (वार्ताहर)
रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा बराच वेळ आवाज येत असताना माझ्या घराची कडी काढत असल्याचा आवाज आला. त्यामुळे मी ‘कोण आहे?’ म्हणून आवाज दिला. त्यानंतर चोर घरापासून निघून गेले.
- विलास जाधव, ग्रामस्थ, बोपेगाव