मुंबई पोलिसांचेही आता ट्विटर हँडल

By admin | Published: December 29, 2015 02:09 AM2015-12-29T02:09:02+5:302015-12-29T02:09:02+5:30

मुंबई पोलिसांनी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणखी एक कवच तयार केले आहे. मुंबई पोलिसांनी आता @Mumbaipolice या नावाने

Mumbai Police's Twitter handle now | मुंबई पोलिसांचेही आता ट्विटर हँडल

मुंबई पोलिसांचेही आता ट्विटर हँडल

Next

मुंबई : मुंबई पोलिसांनी आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणखी एक कवच तयार केले
आहे. मुंबई पोलिसांनी आता @Mumbaipolice या नावाने टिष्ट्वटर हँडल सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या तक्रारी, समस्या, सूचना त्याद्वारे मांडता येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ करण्यात आला. ट्रिबल स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हे अकाउंट सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी सायबर सेलचे सात अधिकारी कार्यरत राहणार आहेत. या ठिकाणी आलेल्या तक्रारी थेट नियंत्रण कक्षात पाठविल्या जातील, तेथून त्या संबंधित विभाग व हद्दीतील पोलीस ठाण्याला कळविल्या जातील, त्यानंतर त्याबाबत कार्यवाही केली जाईल.
या ट्विटरला रात्री ८ वाजेपर्यंत ५६७२ जणांनी ‘फॉलो’ केले. तर २३ जणांनी टिष्ट्वट आणि १७ जणांनी या अकाउंटला लाइक केले आहे. पोलीस आयुक्त जावेद अहमदसुद्धा हे @CPMumbaipolice या नावाने टिष्ट्वटरवर आले आहेत. त्यांनाही
३ हजार ७७१ जणांनी फॉलो तर २३ जणांनी लाइक केले आहे.
हे दोन्ही हँडल अधिकृतरीत्या सुरू झाले आहेत. याआधी बंगळुरू पोलिसांनीही आपले ट्विटर अकाउंट सुरू केले होते. आता त्यात मुंबई पोलिसांची भर पडली आहे.

लवकरच फेसबुक पेजवरही येणार
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी टिष्ट्वटरपाठोपाठ फेसबुकवरही येणार असल्याचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी सांगितले.

‘बिग बी’सुद्धा फॉलोअर : मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटरवर अकाउंट सुरू केल्यापासून क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह अनेक सिनेतारकांनी त्यांचे स्वागत केले. अमिताभ बच्चन यांनी ३ ट्विट करून मुंबई पोलिसांचे या नव्या व्यासपीठावर स्वागत केले.

हे अकाउंट नागरिक आणि पोलिसांना
कनेक्ट करण्यास महत्त्वपूर्ण ठरेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
नागरिकांसाठी मुंबई पोलिसांनी मोलाचा पुढाकार घेतला आहे. यातून नागरिक आणि पोलिसांना एकत्रित जोडण्यास मदत होईल. - प्रियांका चोप्रा
नागरिकांसाठी मुंबई पोलिसांचे टिष्ट्वटरवर स्वागत आहे. हा प्रयत्न नागरिक आणि पोलिसांमध्ये संवाद साधण्यास महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
- फरहान अख्तर

Web Title: Mumbai Police's Twitter handle now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.