मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश

By Admin | Published: August 27, 2015 01:09 PM2015-08-27T13:09:09+5:302015-08-27T15:27:30+5:30

केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी स्मार्ट सिटी योजनेसाठी ९८ शहरांची यादी जाहीर केली असून त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे.

Mumbai, Pune, with 10 cities in the smart city | मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश

मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रातील १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशातील १०० शहरांना 'स्मार्ट सिटी' बनवण्याच्या केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज ९८ शहरांची यादी जाहीर केली.
या यादीत महाराष्ट्रातील १० शहरांची निवड करण्यात आली असून त्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक,नागपूर, अमरावती, सोलापूर व औरंगाबाद यांचा समावेश आहे. तर  उत्तर प्रदेशमधील १३, तामिळनाडूतील १२, मध्य प्रदेशमधील ७, गुजरातमधील ६ , पश्चिम बंगाल व राजस्थानमधील प्रत्येकी ४ आणि बिहार व आंध्र प्रदेशीमधील प्रत्येकी ३ शहरांचा स्मार्ट सिटीजच्या यादीत समावेश आहे. 
केंद्र सरकारच्या "स्मार्ट सिटी‘ प्रकल्पासाठी देशभरातून शंभर शहरांची निवड करायची असून आत्ता सरकारने ९८ शहरे घोषित केली आहेत. जम्मू-काश्मीर नंतर आपली दोन शहरे नोंदवणार आहे. 
 

 

Web Title: Mumbai, Pune, with 10 cities in the smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.