मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:54 AM2018-08-14T05:54:45+5:302018-08-14T05:55:18+5:30

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या.

Mumbai-Pune Express-Waver Now 'ITMS' system! | मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली!

Next

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या.
रस्ता सुरक्षा परिषदेची सातवी बैठक सोमवारी झाली. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्यासह अन्य अधिकारी होते.
नागपूर-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आयटीएमएस सुविधा कार्यान्वित होण्याआधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ही प्रणाली राबवा, अशा सूचना त्यांनी केल्या. तर, निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले. रावते यांनी नागपूर-मुंबई महामार्गावरून खडेबोल सुनावले. ‘वेळ मोजू नका, सुरक्षेला प्राधान्य द्या’ असे ते म्हणाले.

महामार्गावर २५ टोलनाके
नागपूर-मुंबई महामार्गावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी एकूण २५ टोल उभारण्यात येतील. तसेच हे टोलनाके स्वयंचलित असतील. दरम्यान, मुख्य महामार्गावर एकही टोल नसेल, अशी माहिती बैठकीत महामंडळाने दिली.
‘आयटीएमएस’ म्हणजे काय?
महामार्गांवर अपघात टाळण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ राबवतात. हवामान, वाहतूक नियमांची माहिती देणारे डिजिटल फलक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाईसाठी ई-चलान, मोफत वाय-फाय, या आणि अन्य सुविधांचा समावेश आयटीएमएसमध्ये असतो.

सहा महिन्यांत अहवाल द्या
राज्यातील घाटांमधील अपघात रोखण्यासंदर्भात तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा परिषदेत घेण्यात आला. आंबेनळी घाट दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रस्ता संरक्षा तज्ज्ञ, अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने सहा महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करावा.
- दिवाकर रावते,
परिवहन मंत्री

Web Title: Mumbai-Pune Express-Waver Now 'ITMS' system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.