मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; एकाचा मृत्यू तर सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 11:36 AM2017-09-15T11:36:38+5:302017-09-15T11:38:22+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे.
लोणावळा, दि. 15 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या झायलो गाडीचा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानर देवले पुलाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकून हा अपघात झाल्याचं समजतं आहे. या अपघातात गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 6.20 वाजता हा अपघात झाला.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली झायलो मोटार (MH 14 CX 2003) च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघात झालेली झायलो गाडी ओढ्याला लावण्यात आलेले सुरक्षा रोप व लोखंडी अॅगलच्या कठड्यावर आदळून रस्त्याच्या खाली गेली होती. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी ५ किरकोळ जखमी आहेत.
देबशीश लेहरी (वय २० वर्षे रा.डांगे चौक थेरगांव) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर इशान चत्तुरवेदी (वय २०) आयुष काशीद (वय २३), विशाल प्रजापत (वय २१), विपुल पाटीदार (वय २२ सर्व रा.थेरगांव) हे किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. त्यांच्यावर निगडी येथिल लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.