मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर सँट्रोचा भीषण अपघात, ४ ठार
By admin | Published: September 10, 2016 08:01 AM2016-09-10T08:01:46+5:302016-09-10T11:09:56+5:30
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सँट्रो कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सँट्रो कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. लोणावळा येथील वलवण महाविद्यालयाजवळ रात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला.
मृतांमध्ये मुंबई पोलीसचे कर्मचारी राजेंद्र विष्णु चव्हाण (बक्कल नं. ३२१८१) यांचा व त्यांची पत्नी वनीता चव्हाण, शंकर मारुती वेणगुळे, पुजा वेणगुळे (सर्व राहणार मुंबई) यांचा समावेश आहे.
खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात आलेली सँट्रो कार क्र. (एमएच ०४ बी डब्लू ०२२९) ही चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणारा कंटेनर क्र. (एमएच ०६ ऄ क्यु ७५१७) ला मागून जोरात धडकली. ही धडक एवढी भीषण होती की सँट्रो गाडी कंटेनरच्या ४ फूट खाली घुसल्याने आतमध्ये बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला. पनवेल विभागाचे महामार्ग पोलीस निरीक्षक अजित बारटक्के हे महामार्गावरील विशेष कारवाई मोहिमेची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांनी सदर अपघात पाहिला, त्यांनी तातडीने खंडाळा महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी बोलवले खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, सहाय्यक फौजदार अनंता पवार, हवालदार उदय पवार, मारुती शेंडगे, दिलीप कुरंदळे, मायकल सपकाळ व आयआरबीचे पेट्रोलिंग कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या टिमचे सहकारी यांनी सदर सँट्रो कार कंटेनरच्या खालून बाहेर काढत मयतांना गाडीतून बाहेर काढले. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.