मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे जाम, ऑईल सांडल्याने गाड्यांचा वेग मंदावला

By Admin | Published: May 20, 2017 10:23 AM2017-05-20T10:23:49+5:302017-05-20T10:42:18+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरमधून ऑईल सांडल्याने मुंबईकडे जाणा- मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे

The Mumbai-Pune expressway jam, due to the oil spill, the speed of the trains collapsed | मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे जाम, ऑईल सांडल्याने गाड्यांचा वेग मंदावला

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे जाम, ऑईल सांडल्याने गाड्यांचा वेग मंदावला

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 20 - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरमधून ऑईल सांडल्याने मुंबईकडे जाणा- मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल दरम्यान ही घटना घडली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका टँकरमधून खंडाळा बोगदा ते अमृतांजन पुल दरम्यान जवळपास ५०० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात ऑईल रस्त्यावर सांडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. यामुळे मार्गावर  4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या  रांगा लागल्या आहेत. 
 
घटनास्थळी आयआरबीचे कर्मचारी दाखल झाले असून रस्त्यावरील ऑईल हटविण्याचे काम सुरु आहे. गाड्या घसरु नयेत यासाठी ऑईलवर माती टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान सकाळी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवासी यांनी नाराजी व्यक्त केली.
 
तसं पाहायला गेल्यास विकेंडला अनेकजण सुट्टीसाठी मुंबईबाहेर जात असल्याने मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच ऑईल सांडल्याने ही वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे.
 

Web Title: The Mumbai-Pune expressway jam, due to the oil spill, the speed of the trains collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.