Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:19 AM2022-09-16T00:19:13+5:302022-09-16T00:20:05+5:30

एकीकडे सततच्या वाढत्या महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्यांच्या खिशाला टोल दरवाढीमुळे आणखी कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

mumbai pune expressway toll rates likely to be increased from next year 2023 up to 18 percent | Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

googlenewsNext

Mumbai-Pune Expressway Toll Rates: एकीकडे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या मुंबईपुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरांमध्ये लवकरच वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. आताच्या दरांपेक्षा सुधारित दरांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, सन २०२३ मधील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले आहे. 

यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ

मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा मार्ग असून, कमी वेळेत जलदरित्या मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला येणे या एक्स्प्रेस वेमुळे शक्य झाले आहे. मात्र, अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रश्न उपस्थित केले जातात. वाहतूक कोंडीवर तोडगा नाही आणि आपत्कालीन मदत तसेच सुविधा पुरवल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. मात्र टोल वाढ नियमित कालावधीत होत आहे. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा ५० ते ७० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. यापूर्वीही दिग्गज मंडळी, कलाकार, सामान्य प्रवाशांना या मार्गावरील अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. 

Web Title: mumbai pune expressway toll rates likely to be increased from next year 2023 up to 18 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.