मुंबई - पुणे एक्स्पेस वे वरील वाहतूक अजूनही ठप्पच
By Admin | Published: February 20, 2016 03:43 PM2016-02-20T15:43:27+5:302016-02-20T16:35:14+5:30
मुंबई - पुणे एक्स्पेस वे वरील परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र वाहनचालक कोणतेही निर्देश न पाळता वाहने चालवत असल्या कारणाने वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे.
>ऑनलाइन लोकमत -
लोणावळा, दि. 20 - मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर सकाळी तेलाचा टँकर पलटल्याने ठप्प झालेली वाहतूक अजूनही ठप्पच आहे. वाहतूक ठप्प असल्या कारणाने प्रवाशांचे हाल होत आहेत. सकाळी एक्सप्रेस वेच्या खंडाळा एक्झिटजवळच टँकर पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र वाहनचालक कोणतेही निर्देश न पाळता वाहने चालवत असल्या कारणाने वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे.
सकाळी टँकरचा अपघात झाल्यानंतर ऑइल रस्त्यावर पसरलं होत. अपघातग्रस्त वाहन हटवण्यात आले आहे, तसंच ऑइलदेखील साफ करण्यात आलं आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र वाहनचालक कोणतेही नियम न पाळता पुढे जाण्याच्या इरादाने वाहने चालवत असल्या कारणाने वाहतूक कोंडी वाढत चालली आहे.
जोपर्यंत दोन्ही लेनवरील वाहनांचा बॅकलॉग संपणार नाही, तोपर्यंत वाहतूक धीम्या गतीनेच सुरु राहील.