Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक;  'या' वेळेत वाहतूक बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 08:25 AM2023-11-21T08:25:51+5:302023-11-21T08:27:45+5:30

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (२१ नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आली आहे.

Mumbai-Pune Expressway: Two-hour block today on the Mumbai-Pune Expressway; Traffic stop during 'this' time | Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक;  'या' वेळेत वाहतूक बंद राहणार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक;  'या' वेळेत वाहतूक बंद राहणार

मुंबई :  जर तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने (Mumbai - Pune Expressway) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (२१ नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर आज ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. 

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. या मार्गावर गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक ही पुन्हा सुरळीत केली जाणार आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. परंतु आज १२ ते २ या वेळेत महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. 

Web Title: Mumbai-Pune Expressway: Two-hour block today on the Mumbai-Pune Expressway; Traffic stop during 'this' time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.