मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर मिळणार वाय-फायची सुविधा

By admin | Published: January 5, 2017 02:08 PM2017-01-05T14:08:09+5:302017-01-05T14:08:09+5:30

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 94 किमी लांब मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर हायस्पीड वाय-फाय कव्हरेज झोन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे

Mumbai-Pune Expressway will get Wi-Fi facility | मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर मिळणार वाय-फायची सुविधा

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर मिळणार वाय-फायची सुविधा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रवास करताना आता प्रवाशांना लवकरच वाय-फायची सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) 94 किमी लांब मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर हायस्पीड वाय-फाय कव्हरेज झोन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीने टेलिकॉम ऑपरेटर्सना यासाठी निमंत्रण दिलं आहे. 
 
'कोणत्या भागांमध्ये वाय-फाय झोन तयार केला जाऊ शकतो यासंबंधी सविस्तर प्लान देण्यासाठी आम्ही टेलिकॉम ऑपरेटर्सना निमंत्रण दिलं आहे,' अशी माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. 'वाय-फाय नेटवर्कमुळे आम्हाला आणि राज्य महामार्ग पोलिसांनाही सीसीटीव्हीच्या माध्यमातून टोल बूथवर लक्ष ठेवण्यास मदत होईल,' असं किरण कुरुंदकर बोलले आहेत. नेमके किती वाय-फाय झोन आणि हॉटस्पॉट सुरु करायचे हे अजून निश्चित झालेलं नाही. ही सेवा निशुल्क असणार आहे, मात्र यासंबंधी अंतिम निर्णय अजून झालेला नाही. 
 
वाय-फाय व्यतिरिक्त मोबाईल नेटवर्क सुविधाही मजबूत करण्यावर एमएसआरडीसी भर देत आहे. 'एक्स्प्रेस-वेवर अनेक अशी ठिकाणी आहेत जिथे मोबाईल नेटवर्क मिळत नाही. या ठिकाणी टेलिकॉम ऑपरेटर्सनी बेस ट्रान्सिव्हर सर्व्हिस (बीटीएस) बसवावी तसंच इतर पायाभूत सुविधा सुरु कराव्यात, जेणेकरुन प्रवासात मोबाईल नेटवर्कची समस्या होणार नाही यासाठी आम्ही आग्रही आहोत', असं किरण कुरुंदकर यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: Mumbai-Pune Expressway will get Wi-Fi facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.