रूळ पाण्याखाली, रेल्वे कोलमडली; अनेक गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:45 PM2018-07-10T15:45:26+5:302018-07-10T15:46:25+5:30
मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे.
मुंबईः मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. रविवारी सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसानं अनेक रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांवर लोकांच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे. त्यामुळे कधीही न थांबणा-या मुंबईची गतीही काहीशी मंदावली आहे. रस्त्यांपासून रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले आहेत.
अशातच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरच्या ब-याचशा लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींच्या मार्गात बदल केले गेले आहेत. 22106 पुणे- मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर 11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस रद्द केली आहे. 22105 मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसही रद्द केली आहे. तर उद्या धावणारी 11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच आज आणि उद्या धावणारी 51317/51318 पुणे-कर्जत-पुणे पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 11026 पुणे-भुसावळ या ट्रेनच्या मार्गात बदल करून ती दौंड-मनमाडमार्गे वळवली आहे.
तर 11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ ट्रेनही मनमाड-दौंड मार्गे वळवण्यात आली आहे. पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा- भोपाळ मार्गे वळवली आहे. तुतिकोरीन-ओखा विवेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करून ती इगतपुरी-मनमाड-जळगावमार्गे वळवली आहे. यशवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्स्प्रेसही इगतपुरी-भुसावळ- खांडवा- भोपाळ- रतलाम- बेराच मार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.
#RainsUpdate
— Central Railway (@Central_Railway) July 10, 2018
Passengers of following trains kindly note. Inconvenience caused is regretted. pic.twitter.com/9ofV5IvBa4
Pls note the cancellation/Short terminatio/reversal & Diversion of trains due to water logging on tracks at Nallasopara pic.twitter.com/FAuZW2KTVT
— Western Railway (@WesternRly) July 10, 2018