MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:22 IST2018-06-25T11:47:46+5:302018-06-25T12:22:53+5:30
वडाळ्यातल्या भक्ती पार्क येथे दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील जमीन खचली आहे.

MUMBAI RAINS: वडाळ्यात दोस्ती इमारतीच्या बाहेरचा भाग खचला, फोटो पाहून हादरून जाल !
मुंबई- वडाळ्यातल्या अँटॉप हिल परिसरातील दोस्ती नावाच्या इमारतीच्या बाहेरील भाग खचला आहे. या ढिगा-याखाली अनेक गाड्या दबल्या गेल्या असून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. वडाळ्यातल्या लॉर्ड्स इस्टेट परिसरात दोस्ती पार्कजवळील अचानक रस्ता खचल्यानं आजूबाजूच्या परिसरात राहणा-या लोकांची तारांबळ उडाली आहे. पूर्णतः रस्ताच खचल्यानं मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालं. रविवारपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका वडाळ्यात दोस्ती पार्कजवळील इमारतीच्या आजूबाजूच्या परिसराला बसला आहे. रस्ता खचल्यानं जवळपास 15 गाड्या ढिगा-याखाली दबल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या बांधकामाविषयी स्थानिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप असून, आता दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. व्हायब्रेटर मर्यादांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत दीपक गरोडिया, किसन गरोडिया, राजेश शहांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच वडाळा येथील जमीन खचल्यामुळे सी आणि डी विंगमधील लोकांना महापालिकेतर्फे घरे खाली करण्याची सूचना देण्यात आली आहे.