मुंबईत रिक्षा-टॅक्सी संपावरून संघटनांमध्येच जुंपली

By Admin | Published: August 26, 2016 08:35 PM2016-08-26T20:35:24+5:302016-08-26T20:35:24+5:30

ओला ऊबेर या खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक व मालकांच्या दोन युनियनने पुकारलेल्या संपावरून संघटनांमध्येच जुंपली आहे. संप पुकारलेल्या दोन्ही

In Mumbai, the rickshaw-taxi collapse jumped out of the organization | मुंबईत रिक्षा-टॅक्सी संपावरून संघटनांमध्येच जुंपली

मुंबईत रिक्षा-टॅक्सी संपावरून संघटनांमध्येच जुंपली

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 -  ओला ऊबेर या खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या
मागणीसाठी आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक व मालकांच्या दोन युनियनने पुकारलेल्या
संपावरून संघटनांमध्येच जुंपली आहे. संप पुकारलेल्या दोन्ही
युनियनविरोधात इतर संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना करत संपाला
कडाडून विरोध केला आहे. टॅक्सी-रिक्षा चालक-मालक संयुक्त संघर्ष समितीने
शुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
संघर्ष समितीचे निमंत्रक उदय आंबोणकर म्हणाले की, सण तोंडावर असताना
मुंबईकरांना वेठीस धरणे चूकीचे आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत
मुख्यमंत्र्यांनी चर्चा झाली नाही, तरच आंदोलन करण्याची भूमिका कृती
समितीने घेतली आहे. काही संघटनांनी २९ आणि ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक
दिली आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबईकरांना कोणताही त्रास
देणार नाही. शिवाय संप पुकारणाºया संघटनांचा कोणताही त्रास इतर सभासद
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना होऊ नये, म्हणून संरक्षण देण्याची जबाबदारीही
संघर्ष समितीने घेतली आहे. संघर्ष समितीमध्ये शिवसंग्राम टॅक्सी व रिक्षा
युनियनसोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, भारतीय टॅक्सी चालक संघ,
मुंबई टॅक्सी चालक मालक सेना या प्रमुख संघटनांसह इतर ५ संघटनांचा समावेश
असल्याचे आंबोणकर यांनी सांगितले. .
मुंबई टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष निलेश चव्हाण म्हणाले की, शिवसेना
सत्तेत असली, तरी टॅक्सी चालकांसाठी युनियनने सरकारविरोधात न्यायालयात
धाव घेतली आहे. सिटी टॅक्सी स्किम लागू होत नाही, तोपर्यंत बेकायदेशीरपणे
चालविण्यात येणाºया ओला व उबेरच्या कंपन्या व त्यांच्या गाड्यांवर तत्काळ
बंदी घालावी. शासनाने पुढाकार घेऊन स्वत: अ‍ॅफ तयार करावे. शिवाय रिक्षा
व टॅक्सी चालकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी काढावा. अग्रीगेटरसोबत
रिक्षा व टॅक्सी चालक-मालक स्पर्धेत उतरायला तयार असून नियमांप्रमाणे
स्पर्धा व्हावी, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.

Web Title: In Mumbai, the rickshaw-taxi collapse jumped out of the organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.