मुंबई शेअर बाजाराची विक्रमी ङोप
By admin | Published: June 6, 2014 12:00 AM2014-06-06T00:00:33+5:302014-06-06T00:00:33+5:30
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले.
Next
>सेन्सेक्स 25,क्क्क् : युरोपियन सेंट्रल बँकेकडून मिळणार प्रोत्साहन पॅकेज
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स गुरुवारी पहिल्यांदा 25,क्क्क् अंकांच्या पुढे बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांनी धातू, वीज आणि तेल व गॅस कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले.
युरोपीय सेंट्रल बँकेकडून लवकरच प्रोत्साहन पॅकेज सादर करण्याच्या वृत्तामुळे परकीय गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला.
3क् कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तेजीसह उघडला. त्यानंतर बाजार 25,क्44 अंकांर्पयत पोहोचला. सत्रअखेरीस बाजार 213.68 अंकांनी किंवा क्.86 टक्क्यांनी वधारून 25,क्19.51 अंकांवर बंद झाला.
यापूर्वीही सेन्सेक्स 25,क्क्क् अंकापार गेला होता. परंतु गुरुवारच्या सत्रत पहिल्यांदाच बाजार यापेक्षा अधिक अंकांवर बंद झाला. धातू, तेल व गॅस, वीज, सार्वजनिक उपक्रम, एफएमसीजी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 71.85 अंकांनी किंवा क्.97 टक्क्यांनी वधारून 7,474.1क् या नव्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. मागील सत्रत सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली होती. त्यानंतर दोन्ही शेअर बाजारांनी विक्रमी ङोप घेतली.
आगामी अर्थसंकल्पात सरकार उद्योगांसाठी अनुकूल उपाय करतील, या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचे समर्थन केले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्र्हिसेसचे सीएमडी मोतीलाल ओसवाल म्हणाले की, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सेन्सेक्स 3क्,क्क्क्च्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)
बाजारातील 12 विविध क्षेत्रंपैकी 11 क्षेत्रतील शेअर्स क्.17 ते 3.33 टक्क्यांर्पयत वधारले.
सेवा क्षेत्रतील शेअर्समध्ये मागील एक वर्षात पहिल्यांदाच वाढ झाली. यामुळे व्यवसायाला गती मिळण्याची दाट शक्यता आहे.
परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील सत्रत बाजारात 192.56 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
आशियाई शेअर बाजारात मिळताजुळता कल बघायला मिळाला. चीन, जपानचे निर्देशांक वधारले. दुसरीकडे हाँगकाँग, तैवान आणि दक्षिण कोरियाचे बाजार कोसळले. युरोपीय बाजारातसुद्धा मिळताजुळता कल बघायला मिळत आहे.
सेन्सेक्समधील 3क् पैकी 23 कंपन्यांचे शेअर्स फायद्यात, तर उर्वरित घसरणीसह बंद झाले.
येत्या सहा वर्षात म्हणजे सन 2क्2क् र्पयत .मुंबर्ध शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक एक लाखार्पयत जाण्याची शक्यता आहे. एका स्टॉक ब्रोकर फर्मने जाहीर केलेल्या अहवालात ही बाब उघड करण्यात आली आहे.
नव्यानेच अधिकारावर आलेल्या सरकारने जलदगतीने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा लागू केल्या त्याचबरोबर जर कंपन्यांचे उत्पन्न दरवर्षी 2क् ते 25 टक्क्यांनी वाढले तर निर्देशांक ही पातळी गाठू शकते, असे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
सेन्सेक्सने गुरुवारी 25 हजार अंशांचा टप्पा गाठला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात अधिकाररूढ झाल्यापासून बाजारात उत्साहाचे वातावरण असून तेजीचे वारे वाहत आहेत.
या अहवालात चालू वर्षात सेन्सेक्सच्या प्रती समभाग उत्पन्नामध्ये (ईपीएस)15 टक्क; वाढीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये सहा टक्के दराने वाढ होण्याचा अनुमानही वर्तविला गेला आहे.
4परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठा विश्वास दाखविला आहे. चालू वर्षात या संस्थांची भारतातील गुंतवणूक 2क्अब्ज डॉलरहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.