मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:05 AM2024-04-14T10:05:40+5:302024-04-14T10:08:32+5:30

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांनी ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Mumbai, Thane eager to vote for Uddhav Thackeray - Adv. Harshal Pradhan | मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

मुंबई, ठाणे उद्धव ठाकरेंना मतदान करण्यास आतुर - ॲड. हर्षल प्रधान

हर्षल प्रधान

महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक भावनिक आत्मीयता आहे. कोरोनारूपी संकटात महाराष्ट्रातील सामान्यातील सामान्य माणसाला त्याची जात-पात-धर्म-पंथ- भाषा काहीही न पाहता आपला माणूस म्हणून त्याला वाचवण्याची सांभाळण्याची आणि त्याला सुखरूप ठेवण्याची हिमालयाएवढी जबाबदारी अतिशय निकराने मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी पार पाडली. त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर एकीकडे राजकीय चक्रव्यूहात अडकवून सत्ताबाह्य होण्याची वेळ आली तर दुसरीकडे शारीरिक शस्त्रक्रियेसही सामोरे जावे लागले. या सर्व संकटावर मात करत ते पुन्हा उभे राहिले.

स्वतःच्या वडिलांनी कष्टाने वाढवलेला पक्ष आणि त्यांच्या पश्चात अतिशय जिद्दीने आणि स्वाभिमानाने वाढवत उद्धव ठाकरे यांनी स्वतःची एक आश्वासक नेता म्हणून प्रतिमा निर्माण केली. तीच प्रतिमा मोडून काढण्याचा डाव भाजपने टाकला आणि महाराष्ट्र आणि केंद्रातील काही भाजप नेत्यांनाही त्या 'प्रतिमाभंजन नाट्यप्रयोगा'चा एक भाग व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी मुंबई आणि ठाण्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. मुंबई आणि ठाणे या दोन्ही शहरांनी बाळासाहेबांवर निरतिशय प्रेम केलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही या दोन शहरांना कायम आपल्या सर्वोच्च आदरस्थानी ठेवले.

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यासोबत केवळ बंड केले नाही तर ज्या आनंद दिघे यांचा ते जप करतात त्या आनंद मुंबई, ठाणे येथील ९ मतदारसंघात मतदारसंघात मोठ्या उत्साहाने मतदान होईल. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शाखाभेटींना उसळलेली गर्दी आणि मतदारांचा उदंड प्रतिसाद याचे द्योतक होता. मतदार उमेदवार कोण आहेत हे पाहणारच नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार करायला लावणाऱ्या सत्तालोभी भाजपला आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मतदार भरघोस मतदान करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीसोबतही बंड केले आहे. आनंद दिघे यांनी बाळासाहेबांकडे स्वतःसाठी काहीच मागितले नाही. दिवसरात्र ते बाळासाहेब आणि शिवसेनेसाठी झटत राहिले. शिंदे यांनी नेमके याच्या उलट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला स्वतःच्या नावावर करणे, आनंद दिघे यांच्या निष्ठावान कारकीर्दीला डाग लावणे, भाजपच्या काही नेत्यांच्या हातातले बाहुले होणे व त्यांच्या समोर माना डोलावण्यासाठी भाजपचा पट्टा गळ्यात घालणे हे सामान्य शिवसैनिकांना रुचलेले नाही. सतीश प्रधान, आनंद दिघे, मो. दा. जोशी असे अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांनी ठाण्यात घडवले. मात्र कधी आपला स्वाभिमान गहाण ठेवला नाही आणि कोणाला ठेवू दिला नाही, त्यामुळे ठाणेकर या निवडणुकीत ज्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

Web Title: Mumbai, Thane eager to vote for Uddhav Thackeray - Adv. Harshal Pradhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.