मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:55 AM2021-03-14T00:55:10+5:302021-03-14T06:55:03+5:30
ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई/ठाणे :मुंबईसह ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून शनिवारी मुंबईतील रुग्णांच्या संख्येत एक हजार ७०८ रुग्णांची भर पडली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. तर ठाणे जिल्ह्यात दिवसभरात एक हजार १६९ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला. (Mumbai, Thane worries increase! Three thousand corona patients in one day!)
ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. लोकल, परिवहन सेवांतील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढते प्रमाण, सुरक्षित अंतर राखले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ४१ हजार ९८५ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५२४ झाला आहे. मुंबईत १३ हजार २४७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबई, ठाण्याची चिंता वाढली! एका दिवसात तीन हजार कोरोना रुग्णांची भर!