मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे
By admin | Published: November 4, 2016 01:39 PM2016-11-04T13:39:37+5:302016-11-04T13:39:37+5:30
स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांची कुचंबणा होऊ नये यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांची कुचंबणा होऊ नये यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. भविष्यात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालयेही बांधण्याबाबत महापालिका विचार करत आहे.
स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांसाठी वेगळी अशी व्यवस्था नव्हती, त्यामुळे अनेकदा त्यांची टिंगल उडवली जायची. वारंवार होणारी कुचंबणा यामुळे महिला आणि पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे अशी मागणी होऊ लागली होती.
सप्टेंबर महिन्यात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आणि ‘राइट टू पी’च्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली होती. यावेळी हा मुद्दादेखील मांडण्यात आला होता. त्यानंतर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.