मुंबई: वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

By admin | Published: August 6, 2016 06:35 PM2016-08-06T18:35:00+5:302016-08-06T18:36:31+5:30

मुंबईतील वर्सोवा येथील बीचवर तीन तरूण बुडाले असून एकाचा मृतदेह हाती लागला आहे.

Mumbai: Three youths lost to Versova beach | मुंबई: वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

मुंबई: वर्सोवा बीचवर ३ तरूण बुडाले

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - मुंबईतील वर्सोवा येथील बीचवर तीन तरूण बुडाल्याचे वृत्त आहे. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली असून तिघंपैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी काही तरूण वर्सोवा बीचवर दगडांच्या आडोशाला बसून दारू पीत होते. ड्युटीवरील जीवरक्षकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्या तरूणांना तेथून हटवले. मात्र काही वेळाने ते तरूण पुन्हा तेथे आले व दारूच्या नशेतच ते पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील तिघेजण पाण्यात बुडाले. त्यापैकी एकाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तर इतर दोन तरूणांचा शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: Mumbai: Three youths lost to Versova beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.