मुंबई विद्यापीठाला यजमानपद

By admin | Published: August 28, 2015 02:49 AM2015-08-28T02:49:18+5:302015-08-28T02:49:18+5:30

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या गोलमेज परिषदेच्या यजमानपदाचा मान यंदा मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या

Mumbai University is the host of this | मुंबई विद्यापीठाला यजमानपद

मुंबई विद्यापीठाला यजमानपद

Next

मुंंबई : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या गोलमेज परिषदेच्या यजमानपदाचा मान यंदा मुंबई विद्यापीठाला मिळाला आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. त्यात डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अनिल काकोडकर या ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ‘उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण-भावी दिशा’ यावर चर्चासत्र होणार आहे.
दुसऱ्या सत्रात मोहनदास पै, सॅण्ड्रा श्रॉफ, डॉ. जे.बी. जोशी हे मान्यवर सहभागी होतील. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत; तर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai University is the host of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.