संशयिताने घेतली मुंबईच्या तरुणांची भेट

By admin | Published: January 25, 2016 02:46 AM2016-01-25T02:46:23+5:302016-01-25T02:46:23+5:30

शनिवारी उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान अहमद ऊर्फ नवाजुद्दीन ऊर्फ रिझवान याने हाजी अलीजवळ ४ मालवणी तरुणांची भेट घेतली होती,

The Mumbai visit of the suspect took the suspect | संशयिताने घेतली मुंबईच्या तरुणांची भेट

संशयिताने घेतली मुंबईच्या तरुणांची भेट

Next

डिप्पी वांकाणी,  मुंबई
शनिवारी उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान अहमद ऊर्फ नवाजुद्दीन ऊर्फ रिझवान याने हाजी अलीजवळ ४ मालवणी तरुणांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे. यासंबंधीचे पुरावे महाराष्ट्र एटीएसकडे असल्याची माहिती आहे.
एटीएसशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, रविवारी एटीएसने रहमान नावाच्या आणखी एका तरुणाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. रहमानही याच मोड्युलचा भाग असल्याची माहिती आहे. तो भांडुपमध्ये अखेरचा आढळून आला होता. मालवणीमधून चार तरुण बेपत्ता आहेत. त्यातील एक जण आॅक्टोबरपासून, तर दुसरा डिसेंबरपासून गायब आहे. अयाज सुलतान नावाचा एक तरुण काबूलला गेला असून तो तालिबानमध्ये
भरतीही झाला आहे. नूर मोहंमद
आणि वाजेद शेख हे दोन तरुण परत आले आहेत. मोहसीन चौधरी नावाचा तरुण फरार असून त्याने अफगाणिस्तानची सीमा ओलांडल्याची शक्यता आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले
की, रिझवानने चार तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी कट्टरपंथी बनविल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तो
मुंबईत येऊन किमान एका तरुणाला हाजी अलीजवळ भेटल्याची
खात्रीशीर माहिती आहे. आमचे
पथक रिझवानला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील शिसवा मताया गावात गेले होते,
तेव्हा त्याच्या कुटुंबाला अजिबात धक्का बसला नाही. तो काही
तरी बेकायदेशीर काम करीत असल्याचा अंदाज आम्हाला
होता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी माझगावमधून अटक केलेल्या खान मोहंमद हुसैन
याच्याकडे बनावट कागदपत्रांच्या साह्याने १५० मोबाईल सीमकार्ड मिळविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे कार्ड भरती
करण्यात आलेल्या अतिरेक्यांना दिले जाणार होते.

Web Title: The Mumbai visit of the suspect took the suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.