मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 25, 2017 06:35 PM2017-02-25T18:35:49+5:302017-02-25T18:35:49+5:30

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

Mumbai will be the mayor of Shivsena - Uddhav Thackeray | मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे

मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना भवनात उद्दव ठाकरे यांची सेनेच्या नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. यासोबतच प्रलोभने, अमिषांन बळी पडू नका असं आवाहन त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केलं आहे. मतदार यादीत घोळ नसता तर चित्र वेगळं असतं असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर आमचाच होणार असं म्हटलं होतं. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला युतीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला नसून, खोट्या बातम्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्याचा दावा केला होता. 
 
(शिवसेनेने पाठिंब्यासाठी विचारले होते - संजय निरुपम)
 
दुसरीकडे मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय रॅलीत बोलताना ,'भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात', असं म्हटलं आहे.  भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेसला सोबत घेणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. 
 
(फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब)
 
मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे. मनपा निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापनासाठी  दोन्ही पक्षांकडून सत्तेची समिकरणं जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
 
(काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी)
 
यावर शिवसेनेने पाठिंब्यासाठी प्रस्ताव दिल्याचे समजले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यास आमचा नकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी सांगितले. तसेच छोटे पक्ष मिळून महापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितले.  संजय निरुपम यांच्या वक्तव्यावर शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय, शिवसेनेकडून याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 
 
तर दुसरीकडे, 'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे. 
 

Web Title: Mumbai will be the mayor of Shivsena - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.