मुंबई २५ मार्चनंतर आणखी तापणार, पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 07:00 AM2019-03-23T07:00:01+5:302019-03-23T07:00:03+5:30

पूर्वेकडून वाहत असलेल्या तीव्र उष्ण वाऱ्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला असून, आठवडाभर हीच स्थिती कायम राहील,

 Mumbai will have more heat after March 25, due to the hot wind blowing from the east | मुंबई २५ मार्चनंतर आणखी तापणार, पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्याचा परिणाम

मुंबई २५ मार्चनंतर आणखी तापणार, पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्याचा परिणाम

Next

मुंबई : पूर्वेकडून वाहत असलेल्या तीव्र उष्ण वाऱ्याचा परिणाम म्हणून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांचा कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला असून, आठवडाभर हीच स्थिती कायम राहील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे मुंबईचे कमाल तापमान आता ३० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी २५ मार्चनंतर मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर जाईल, असेही भुते यांनी सांगितले.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. दरम्यान, पूर्वेकडून वाहत
असलेल्या उष्ण वाऱ्यांच्या
प्रभावामुळे २५ मार्चनंतर मुंबई आणखी तापेल. त्यामुळे मे महिन्यापूर्वीच मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील हवामान आज राहणार कोरडे
२३ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
२४ मार्च : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हवामान कोरडे राहील.
२५ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील.
२६ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

अंदाज मुंबईचा
२३ मार्च : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३१, २० अंशाच्या आसपास राहील.
२४ मार्च : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान ३२, २१ अंशाच्या आसपास राहील.

Web Title:  Mumbai will have more heat after March 25, due to the hot wind blowing from the east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.