मुंबईला दूधटंचाई भासणार नाही; पुरवठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:38 AM2018-07-15T06:38:23+5:302018-07-15T06:38:54+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून पुकारलेल्या दूध संकलन व वाहतूक बंदचा मुंबईला फटका बसणार नाही, याची तजवीज दूध संघांनी केली आहे.

Mumbai will not suffer milk shortage; Supply Increase | मुंबईला दूधटंचाई भासणार नाही; पुरवठ्यात वाढ

मुंबईला दूधटंचाई भासणार नाही; पुरवठ्यात वाढ

Next

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून पुकारलेल्या दूध संकलन व वाहतूक बंदचा मुंबईला फटका बसणार नाही, याची तजवीज दूध संघांनी केली आहे. त्यांनी दोन दिवस आधीच दुधाची मुंबईला होणारी वाहतूक वाढविली असून, किमान दोन दिवस दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात सरकारने प्रति लीटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून दूध संकलन व दूध वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे.
मुंबई व पुणे येथे रोज एक कोटी लीटर दुधाची गरज आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा ‘अमूल’चा असून, त्यानंतर‘गोकुळ’ ‘वारणा’व इतर संघांचा आहे. आंदोलन ताणले, तर किमान दोन दिवस दूधटंचाई भासणार नाही, याची दक्षता संघांनी घेतली आहे.
>दृष्टीक्षेपात विक्री
एकूण विक्री :
एक कोटी लीटर
राज्य दूध संघाकडून : ६० लाख लीटर
इतर दूध संघ :
४० लाख लीटर

Web Title: Mumbai will not suffer milk shortage; Supply Increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :milkदूध