मुंबईत इमारतींसाठी आता २ ते ५ एफएसआय राहणार
By admin | Published: April 27, 2016 06:25 PM2016-04-27T18:25:19+5:302016-04-27T18:25:19+5:30
मुंबईतील इमारतींसाठी आता दोन ते पाचपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने एफएसआयबाबत नवे नियम तयार केले असून यामध्ये आता म्हाडा
Next
>ऑनालाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मुंबईतील इमारतींसाठी आता दोन ते पाचपर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने एफएसआयबाबत नवे नियम तयार केले असून यामध्ये आता म्हाडा, व्यावसायिक आणि ट्रान्झिस्ट कॅंपच्या इमारतींचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेच्या नव्या नियमानुसार मुंबईत आता २ ते ५ एफएसआय राहणार आहे. यामध्ये म्हाडाच्या इमारतींसाठी ४ एफएसआय, व्यावसायिक इमारतींसाठी ५ एफएसआय, कायमस्वरुपी ट्रान्झिस्ट कॅंपसाठी ४ एफएसआय देण्यात येणार आहे.