मुंबईकरांच्या आरोग्यावर ११५ नगरसेवक, ४ आमदारांचे मौन

By admin | Published: July 7, 2016 09:27 PM2016-07-07T21:27:23+5:302016-07-07T21:27:23+5:30

वेगवेगळी वक्तव्ये करून चर्चेत राहणारे मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत.

Mumbaikar's 115 municipal councilors, 4 MLAs | मुंबईकरांच्या आरोग्यावर ११५ नगरसेवक, ४ आमदारांचे मौन

मुंबईकरांच्या आरोग्यावर ११५ नगरसेवक, ४ आमदारांचे मौन

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ : वेगवेगळी वक्तव्ये करून चर्चेत राहणारे मुंबईतील नगरसेवक आणि आमदार मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मात्र मौनीबाबा झाले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईतील ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात तर चार आमदारांनी २०१४ हिवाळी अधिवेशन व २०१५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईकरांच्या आरोग्याबाबत एकही प्रश्न विचारला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे. मुंबई महापालिकेत मुंबईकरांनी एकूण २२७ नगरसेवक निवडून दिलेले आहेत. मात्र त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ११५ नगरसेवकांनी महापालिका सभागृहात आरोग्याबाबत एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या वर्षभराच्या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तर उरलेल्या ११२ नगरसेवकांनी आरोग्याबाबत ४१२ प्रश्न उपस्थित केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य समितीमध्ये असलेल्या ३६ नगरसेवकांमधील चार नगरसेवकांनीही मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मौन बाळगल्याची माहिती आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी गेल्या वर्षभरात आरोग्याबाबत महापालिका सभागृहात सर्वाधिक म्हणजेच ५७ प्रश्न उपस्थित केले आहेत.

विधानसभेतही मुंबईतील चार मंत्री वगळल्यास उरलेल्या ३२ आमदारांपैकी ४ आमदारांनी आरोग्याबाबत मौनीबाबाची भूमिका घेतल्याचे दिसते. या चार मौनीबाबांमध्ये आमदार रमेश लटके, आमदार राम कदम, आमदार तृप्ती सावंत, आमदार तमिल सेल्वन यांचा समावेश आहे. याउलट अधिवेशन काळात दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी आरोग्याबाबत सर्वाधिक म्हणजेच ६६ प्रश्न विचारले आहेत.

Web Title: Mumbaikar's 115 municipal councilors, 4 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.