वाहन कर चुकवण्यात मुंबईकर आघाडीवर

By admin | Published: March 6, 2017 06:22 AM2017-03-06T06:22:31+5:302017-03-06T06:23:29+5:30

भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. मात्र हीच आर्थिक राजधानी वाहन कर चुकवण्यात आघाडीवर आहे.

Mumbaikars lead the tax on vehicle tax | वाहन कर चुकवण्यात मुंबईकर आघाडीवर

वाहन कर चुकवण्यात मुंबईकर आघाडीवर

Next


मुंबई : भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. मात्र हीच आर्थिक राजधानी वाहन कर चुकवण्यात आघाडीवर आहे. परराज्यात महागड्या व आलिशान गाड्यांची नोंदणी करून कर चुकवणाऱ्या आणि नंतर महाराष्ट्रात वाहन चालवणाऱ्या कार मालकांवर आरटीओकडून कारवाईची करण्यात आली आहे. यात आतापर्यंत ५९२ महागड्या वाहनांवर कारवाई करण्यात आली असून यातील ४३१ वाहने ही मुंबईतील असल्याचे समोर आले आहे. मुंबईनंतर पुणे आणि त्याचबरोबर ठाण्यातीलही कर चुकवणाऱ्यांचा नंबर लागतो.
महाराष्ट्र सोडता काही राज्यांत वाहन कर हा जवळपास ५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हाच कर जवळपास २० टक्के एवढा आहे. त्यामुळे कमी कर असणाऱ्या राज्यात वाहन नोंदणी केल्यानंतर, कर चुकवून ही वाहने महाराष्ट्रात चालवली जातात. अशा वाहनांवर राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. १८ जानेवारीपासून परिवहन विभागाकडून महाराष्ट्राबाहेर नोंदणी करणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाईस सुरुवात करण्यात आली. या कारवाईत सिक्किम, पाँडेचेरी,झारखंड यासह अन्य ठिकाणी नोंद झालेल्या वाहनांना पकडण्यात आले. यामध्ये मर्सिडीज, आॅडी, फेरारी, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्या पकडण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५९२ वाहने पकडण्यात आली असून यामध्ये मुंबईतील ४३१ वाहने आहेत.
त्यानंतर पुण्यातील ६३, ठाण्यातील २२, पनवेलमधील २१, नवी मुंबईत २२, नाशिक विभागातील ११, औरंगाबादमध्ये चार यासह अन्य शहरातही वाहने पकडण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. पकडण्यात आलेल्या
प्रत्येक वाहनांची किंमत ही २५ लाखांपासून ते चार कोटींपर्यंत आहे. (प्रतिनिधी)
कर चुकवणाऱ्या महागड्या वाहनांवर आरटीओची कारवाई
आरटीओकडून साडेपाच कोटी रुपये कर वसूल
मुंबईनंतर पुण्याचा, ठाण्याचा नंबर
आरटीओकडून कर वसुली
वाहन कर चुकवल्याने वाहन मालकांकडून कर वसुलीही करण्यात आली आहे. आतापर्यंत साडेपाच कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.
>या कारवाई दरम्यान बॉलिवूडमधील दोन सेलिब्रेटींच्या महागड्या गाड्यांवरही वाहन कर चुकवल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
>मुंबईत कर चुकवणारी सर्वाधिक वाहने पकडण्यात आली आहेत. अन्य शहरातही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ५९२ महागड्या गाड्या पकडण्यात आल्या. ही कारवाई यापुढेही सुरूच राहील. त्यामुळे वाहन कर भरा हेच आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
- प्रदीप शिंदे, उपपरिवहन आयुक्त (अंमलबजावणी)

Web Title: Mumbaikars lead the tax on vehicle tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.