मुंबईकरांचा रेल्वे प्रवास महागणार? रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला भाडेवाढीचा प्रस्ताव

By admin | Published: November 2, 2016 10:03 AM2016-11-02T10:03:31+5:302016-11-02T12:20:49+5:30

गेल्या वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याने मुंबईकरांना फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Mumbaikar's train travel expensive? The proposal for fare to be sent to the railway board | मुंबईकरांचा रेल्वे प्रवास महागणार? रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला भाडेवाढीचा प्रस्ताव

मुंबईकरांचा रेल्वे प्रवास महागणार? रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला भाडेवाढीचा प्रस्ताव

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - गेल्या वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गांवर भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याने मुंबईकरांचा प्रवास महागण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेने भाडेवाढीसंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास तिकीट आणि मासिक पासच्या दरांमध्ये मोठी वाढ होणार असून त्याची  झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. 
गेल्या वर्षात पश्चिम रेल्वेला झालेला १४०० कोटींचा तोटा झाला होता, तो भरून काढण्यासाठीच हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीच्या दरांमध्ये फारसा फरक पडणार नसला तरी उपनगरीय रेल्वे प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या  फर्स्ट क्लासच्या पासमध्ये ४७ टक्के तर सेकंड क्लासच्या पासच्या दरांमध्ये ३८ टक्के इतकी घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या किमान तिकीटासाठी असलेलं 9 किमीची मर्यादाही 5 किमीवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिचाला चाट बसणार आहे.
गेली अनेक वर्षे १४ ते १६ पैसे प्रतिकिमी या अल्प दरात मुंबई उपनगरीय रेल्वेची वाहतूक होत होती. त्यामुळेच हा तोटा झाला असून तो भरून काढण्याची गरज असल्यामुळे केंद्राकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत हा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते. 
 
 

Web Title: Mumbaikar's train travel expensive? The proposal for fare to be sent to the railway board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.