मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा, रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:58 AM2017-08-08T04:58:12+5:302017-08-08T12:56:56+5:30

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे.

Mumbai's 25-million-strong grand rally | मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा, रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा

मुंबईत निघणार २५ लाखांचा महामोर्चा, रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा

Next

चेतन ननावरे 
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने रेकॉर्डब्रेक मोर्चाचा दावा करत, नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.
समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, महामोर्चा हा मूक स्वरूपाचा असून, मुंबईच्या इतिहासात तो सर्वात मोठा असेल. आतापर्यंत ५७ मूक मोर्चे झाले असून, त्याप्रमाणेच या ५८व्या मोर्चाची आचारसंहिता असेल. सकाळी ११ वाजता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून मोर्चाला सुरुवात होईल. दरम्यान, कोणत्याही प्रकारची भाषणे आणि घोषणा या वेळी दिल्या जाणार नाहीत. राणीबागहून निघालेला मोर्चा कै. अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल.
मोर्चाच्या तयारीसाठी आवश्यक पालिका, पोलीस, वाहतूक, अग्निशमन दल आणि इतर आवश्यक यंत्रणांच्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या मोर्चाला सामाजिक संस्था, गणशोत्सव व दहीहंडी मंडळे, मुंबईचे डब्बेवाले, रेल मराठाचे स्वयंसेवक, मराठा मेडिको असोसिएशन, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड यांसह राजकीय, मुस्लीम आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चेंबूरपासून वाहतुकीला बगल
मुंबईतील भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येईल.

मोर्चेकऱ्यांसमोर संयुक्त समितीचा प्रस्ताव!
मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाºया मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. मोर्चाच्या आधी सरकार आणि मोर्चेकºयांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होण्याची शक्यता नाही.

 

मराठा क्रांती मोर्चादरम्यान मुंबईतील वाहतूक सुरळित रहावी यासाठी पोलीसांनी केलेली तयारी

Web Title: Mumbai's 25-million-strong grand rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.