मुंबईतील व्यापा:याचे प्रेत साता:यात

By admin | Published: September 6, 2014 02:24 AM2014-09-06T02:24:07+5:302014-09-06T02:24:07+5:30

अनैतिक संबंधातून मुंबईत व्यावसायिकाचा खून करून, नंतर त्याच्याच कारमधून मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात आणून पेटवून दिल्याची घटना 21 दिवसांनंतर उघडकीस आली.

Mumbai's commerce: its dead body satya: in it | मुंबईतील व्यापा:याचे प्रेत साता:यात

मुंबईतील व्यापा:याचे प्रेत साता:यात

Next
वाठार स्टेशन (जि. सातारा) : अनैतिक संबंधातून मुंबईत व्यावसायिकाचा खून करून, नंतर त्याच्याच कारमधून मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात आणून पेटवून दिल्याची घटना 21 दिवसांनंतर उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित महिलेसह सातजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
कलविरसिंग गुज्जर (42) हे इलेक्ट्रिक वस्तूंचे व्यावसायिक घाटकोपरला कुटुंबीयांसमवेत राहत होते. घराजवळच त्यांचे दुकान आहे. याच दुकानात गेल्या दहा वर्षापासून काम करीत असलेल्या रतन गायकवाडशी  कलवीरसिंगचे अनैतिक संबंध होते. अन्य महिलांशीही कलवीरसिंगचे संबंध होते. याचाच राग मनात ठेवून रतनने दुकानात जाणो बंद केले. तरीही, कलवीरसिंग रतनच्या घरी जातच होता. 
रतनने मानलेला भाऊ विवेक येवले (रा. अंबवडे संमत, ता. कोरेगाव) याला 13 ऑगस्ट रोजी याबाबतची माहिती दिली. विवेकने सातारा जिल्ह्यातील त्याच्या अन्य पाच मित्रंना घाटकोपरला बोलावून घेतले. त्याच रात्री कलवीरसिंग रतनच्या घरी आल्यानंतर सातजणांनी तोंडावर उशी दाबून त्याचा खून केला. त्यानंतर कलवीरसिंगच्याच कारमधून त्याचा मृतदेह वाठार स्टेशनजवळील फडतरवाडी-भाडळे घाटात नेला आणि रॉकेल ओतून तो पेटवून दिला. 
कलवीरसिंगची मुलगी व त्याच्या मित्रंनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तो बेपत्ताची तक्रार दिली होती.  दोन दिवसांपूर्वी साता:यात पृथ्वीराज वैराट याला बोलते केल्यावर 
पोलिसांनी विवेक अशोक येवले, निखिल प्रकाश वाघमळे, राजेश विलास कांबळे, संतोष बाबासाहेब बनसोडे, पृथ्वीराज अनिल वैराट, दीपक नारायण आवळे व रतन दयानंद गायकवाड या सातजणांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)
 
मृतदेहाचे जळालेले अवशेष ताब्यात
भाडळे घाटात जाऊन पोलिसांनी पावसामुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून रतन गायकवाड हिलाही बारामती येथून रात्री अटक केली. 

 

Web Title: Mumbai's commerce: its dead body satya: in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.