मुंबईत पुन्हा ‘दम मारो दम’

By admin | Published: December 9, 2014 01:10 AM2014-12-09T01:10:40+5:302014-12-09T01:10:40+5:30

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील हुक्कापार्लरवरील बंदी उठविल्याने त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, हे साहजिकच आहे.

Mumbai's 'Dum Maro Dum' | मुंबईत पुन्हा ‘दम मारो दम’

मुंबईत पुन्हा ‘दम मारो दम’

Next
टीम लोकमत ल्ल मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील हुक्कापार्लरवरील बंदी उठविल्याने त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, हे साहजिकच आहे. मुळात ही बंदी उठविल्याने मुंबईतील हुक्कापार्लरला आता मोकळे रान मिळाले असले तरी त्याचा परिणाम देशभर होणार आहे. कारण अशाने देशभर हुक्कापार्लर आता बेधडकपणो सुरू राहणार आहेत.
मुंबईत वास्तव्य करणारे ज्येष्ठ नागरिक विन्सेन्ट नाजरेथ 2क्क्8 पासून हुक्कापार्लरवर बंदी यावी; म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील हुक्कापार्लर बंद करण्यात यावे म्हणून त्यांनी पोलिसांसह अनेक हुक्कापार्लरवर धाडी टाकल्या आहेत. विशेषत: 2क्क्8 पासून आजतागायत मुंबईतील 2क्1 हुक्कापार्लर बंद करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
त्यानंतर त्यांनी 2क्12 साली हुक्कापार्लर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी हुक्कापार्लरविरोधात निर्णय दिला. हॉटेलमध्ये हुक्कापार्लरला बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. परंतु सर्वोच्च न्यायालयात आता ही बंदी उठवण्यात आली आहे. परिणामी आता सरसकट हॉटेलमध्ये हुक्कापार्लर सुरू होतील. शिवाय अशा हुक्कापार्लरमुळे तरुणाई व्यसनाच्या आणखी आहारी जाईल, असेच चित्र निर्माण झाल्याची प्रतिक्रिया विन्सेन्ट यांनी दिली. 
 
 
पोलिसांमध्ये निराशा
एकीकडे नशामुक्त पिढी घडविण्यासाठी धडपडायचे आणि दुसरीकडे हुक्कापार्लरमध्ये तरुणाईला शिरू द्यायचे हा विरोधाभास असल्याचे मत मुंबई पोलीस दलातून व्यक्त होत आहे. मुंबई अमली पदार्थमुक्त व्हावी, यासाठी अनेक उपक्रम राबविले. त्यात स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन शाळा-महाविद्यालयांमध्ये सुरू असलेली अत्यंत प्रभावी जनजागृती मोहीम, अमली पदार्थाची खरेदी-विक्री करणा:या प्रत्येकाची माहिती मिळावी, यासाठी माहितीचा स्रोत विस्तृत करण्यावर भर दिला. या व्यसनमुक्तीसाठी समर्पित अभियानाला सर्वोच्च न्यायालयाने हुक्कापार्लरवरील बंदी उठवून छेद दिल्याचे मतही पोलीस दलातून व्यक्त होत आहे. 
 
सहा वर्षापूर्वी सुरू झाली कारवाई
हुक्कापार्लरविरोधात तत्कालीन महापौर डॉ़ शुभा राऊळ यांनी 2क्क्8 मध्ये मोहीम उघडली होती़ अनेक ठिकाणी धाड टाकून त्यांनी हुक्कापार्लरला टाळेही लावले होत़े याबाबत तत्कालीन गृहमंत्री आऱआऱ पाटील यांच्यार्पयत त्यांनी हे प्रकरण नेऊन हुक्कापार्लर कायमचे बंद करण्याची मागणी केली होती़ पालिकेकडून उपाहारगृहाचा परवाना घेऊन काही ठिकाणी छोटे-छोटे हुक्का पार्लर चालत असून यामध्ये महाविद्यालयीन मुलेच अधिक असल्याचे उजेडात आले होत़े 
 
हुक्क्याचे आरोग्यावर दुष्परिणाम
संशोधनानुसार हुक्का ओढल्यावर आरोग्यावर तेवढाच दुष्परिणाम होतो, जेवढा सिगारेटने होत असतो़ 2क् ते 8क् मिनिटे हुक्का ओढण्याचे प्रमाण असत़े यात 5क् ते 2क्क् झुरके मारले जातात़ यामुळे एका सिगारेटच्या पाकिटाच्या तुलनेत पाच ते दहा टक्के मोनो ऑक्साईड आणि टार सोडले जात़े जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार हुक्का ओढणो आणि सिगारेट ओढणो यात समान धोका असतो़
 
निकालपत्रनंतरभूमिका ठरवू
हुक्कापार्लर बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत अद्याप हाती आलेली नाही. ती हाती आल्यावर सर्वोच्च न्यायालयाचे नेमका दृष्टिकोन काय याचा अभ्यास करून पुढील भूमिका ठरवली जाईल. 
- धनंजय कुलकर्णी, प्रवक्ते, मुंबई पोलीस

 

Web Title: Mumbai's 'Dum Maro Dum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.