मुंबईच्या किमान तापमानात वाढ!
By admin | Published: December 20, 2015 12:58 AM2015-12-20T00:58:34+5:302015-12-20T00:58:34+5:30
राज्यात थंडीचा कडाका वाढतच असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर शनिवारी मुंबईच्या किमान तापमानात
मुंबई : राज्यात थंडीचा कडाका वाढतच असून, शनिवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे, तर शनिवारी मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशाची वाढ नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान अनुक्रमे १५, १४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. दुसरीकडे २१ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईवर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती. मात्र, ढगाळ वातावरण विरून गेल्यानंतर, मुंबईच्या किमान तापमानात पुन्हा घट नोंदविण्यात आली. राज्यातही सर्वसाधारण हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. देशाच्या ईशान्यसह उत्तरेकडून दक्षिणकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात येऊ लागले. गेल्या २४ तासांत कोकणाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये...
पुणे १४, अहमदनगर १३.४, जळगाव १२, महाबळेश्वर १५.५, मालेगाव १२.४, नाशिक ११.५,
उस्मानाबाद १५.३, औरंगाबाद १४.९, परभणी १६.१, नांदेड १४.५
अकोला १४.२, अमरावती १३.२,
बुलढाणा १४.६, नागपूर ११.३,
वर्धा १३.५, यवतमाळ १५.