मुंबईच्या नेहाला ओबामांची दावत

By admin | Published: July 27, 2014 02:12 AM2014-07-27T02:12:16+5:302014-07-27T02:12:16+5:30

गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या नेहा नाईक या 23 वर्षे तरुणीला चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासमवेत भोजन करण्याची संधी मिळाली आहे.

Mumbai's Neha Banquet Festival | मुंबईच्या नेहाला ओबामांची दावत

मुंबईच्या नेहाला ओबामांची दावत

Next
मुंबई : गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या नेहा नाईक या 23 वर्षे तरुणीला चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यासमवेत भोजन करण्याची संधी मिळाली आहे. 31 जुलै रोजी व्हाइट हाऊसमध्ये हा भोजन समारंभ आयोजित करण्यात आला असून, यासाठी तिला आमंत्रित करण्यात आले आहे. 27 जुलै या तिच्या जन्मदिनाची यानिमित्ताने जणू काही तिला भेटच मिळाल्याची प्रतिक्रिया नेहाने ‘लोकमत’ला दिली असून, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
नाईक कुटुंब मूळचे गोव्याचे. मात्र ते देखील इतरांप्रमाणो पोटापाण्यासाठी मुंबईत स्थायिक झाले. नेहा पाच वर्षाची असताना मेंदुज्वरामुळे तिला बौद्धिक अक्षमता आली. दरम्यानच्या काळात ती सर्वसामान्य मुलांसारखीच होती. परंतु कालांतराने तिचा इतर मुलांप्रमाणो विकास साधता येत नव्हता. त्याचवेळी तिची आई आशा आणि बाबा प्रकाश नाईक यांनी तिची गरज ओळखली. त्यांनी तिला गोरेगाव येथील  ‘पुनर्वास’ या विशेष मुलांच्या शाळेत घातले. तेव्हा कुठे तिची प्रगती होत गेली. अभ्यासात तिला इतर मुलांप्रमाणो गती घेता आली नाही. परंतु संभाषण कला आणि वक्तृत्व यात मात्र तिने इतरांना मागे टाकले. तिच्या आईवडिलांनी नेमकी तिची ही कला हेरली.
2क्13 साली कोरियामध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये तिला भारताची अॅम्बेसिडर म्हणून निवडण्यात आले आणि तिने अक्षरश: या संधीचे सोने केले. महत्त्वाचे म्हणजे विशेष मुलांच्या गरजा आणि आपली जडणघडण याबाबत तिन्हे ऑलिम्पिक्समध्ये जे भाषण केले; त्यामुळे तिची निवड ‘इंटरनॅशनल ग्लोबल मेसेंजर’ म्हणून करण्यात आली. याचवेळी तिच्यासोबत अन्य देशांतील अकरा मुलांचीही ‘इंटरनॅशनल ग्लोबल मेसेंजर’ म्हणून निवड करण्यात आली. याच 12 जणांना ओबामांनी 31 जुलै रोजी जेवणाचे आमंत्रण दिले असून, नेहा आपले मार्गदर्शक जॉनीता रॉड्रिक्झ यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये होणा:या भोजन समारंभाला हजेरी लावणार आहे. दरम्यान, नेहा हिने आतार्पयत कोरिया, सिंगापूर, वॉशिंग्टन, ग्रीस, थायलंड या देशांच्या वा:या केल्या आहेत. शिवाय सध्या नेहा देशाच्या स्पेशल ऑलिंम्पिक्स कार्यक्रमाअंतर्गत खेळांमध्ये आवड असलेल्या विशेष मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम करते आहे.
 
विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्याची इच्छा
व्हाइट हाऊसमधून जेवणाच्या आमंत्रणाचा मेल आला तेव्हा मी तो पहिल्यांदा माङया आईवडिलांना दाखविला. ओबामांनी मला जेवणाचे आमंत्रण दिले, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मात्र आता माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ओबामा यांच्या भेटीसाठी मी उत्सुक आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओबामा जेव्हा कधी भारतभेटीवर येतील तेव्हा त्यांनी येथे विशेष मुलांसाठी शाळा सुरू करण्यावर भर द्यावा, अशी इच्छा मी त्यांच्याकडे प्रकट करणार आहे. - नेहा नाईक
 
..तर त्यांच्या आयुष्याचे सोने होईल
सरकार अशा विशेष मुलांसाठी काहीच करीत नाही याची खंत आहे. उलटपक्षी विशेष मुलांसाठी सरकारने शाळा काढल्या पाहिजेत. त्यांना नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. असे केले तर निश्चितच त्यांच्या आयुष्याचे सोने होईल. - प्रकाश नाईक (बाबा)
 
स्वप्नातही वाटले नव्हते..
नेहा ही ओबामांना भेटेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र आता ते प्रत्यक्षात घडणार आहे. तिच्या भेटीबद्दल आम्ही सारेच उत्सुक आहोत. साहजिकच तिच्यापेक्षा आम्हीच अधिक आनंदात आहोत. - आशा नाईक (आई) 

 

Web Title: Mumbai's Neha Banquet Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.