जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 07:09 AM2019-11-04T07:09:49+5:302019-11-04T07:10:35+5:30

मुंबई बंदर : दहा महिन्यांत दोन लाख ३२ हजार जणांचा क्रुझद्वारे जलप्रवास

Mumbai's rising trend towards water travel | जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

Next

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जलपर्यटनाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबई बंदरात येणाऱ्या विविध अत्याधुनिक जहाजांमुळे मुंबईकरांचा जलप्रवासाला जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांद्वारे जलपर्यटनासाठी दोन लाख ३२ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई बंदरातून क्रुझ पर्यटनाला चालना मिळावी व जलपर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षी २५५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले होते व त्यांनी येथून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. २०१७ मध्ये ही संख्या ४६ होती व २०१८ मध्ये त्यामध्ये भर पडून १०६ जहाजे मुंबईत आली होती. क्रुझद्वारे पर्यटनाला आलेल्या व येथून जाणाºया प्रवाशांची संख्या २०१७च्या ५६ हजारांवरून २०१८ मध्ये ८७ हजारांवर गेली होती. सातत्याने या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगात सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील आठवड्यात मुंबई ते सुरत जहाज सेवा
मुंबई ते सूरत जाण्यासाठी नवीन जहाज सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा मार्गावर जहाज सेवा उपलब्ध असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई सुरत मार्गावर जहाज सेवा सुरू करण्यात येणार आहे. गोवाला जाणारी जहाजे सध्या भाऊचा धक्का येथील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून सुटतात, तर सुरत जाणारे जहाज वांद्रे वरळी सी लिंक येथून सुटेल व दुसºया दिवशी सुरतजवळील हजिरा बंदरात पोहोचेल.

५८ हजार प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवास
जलपर्यटन करणाºया अडीच लाख प्रवाशांमध्ये ५८ हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३८ हजार होती. देशभरातील मुंबई, चेन्नई, कोचिन, नवीन मंगळुरू व मार्मागोवा या बंदरावर १२८ आंतरराष्ट्रीय जहाजे आली होती. यंदा त्यामध्ये भर पडून १५७ आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन झाले.

येत्या काळात १० लाख जणांचा जलप्रवास!
मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज प्रवासाला चालना मिळण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने या सेवांमध्ये वाढ होत आहेत. २०२५पर्यंत मुंबईत १ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जहाजे येतील व त्याद्वारे १० लाख जण प्रवास करतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai's rising trend towards water travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई