मुंबईची संपत्ती 820 अब्ज डॉलर्स, 264,000 कोटयधीश आणि 95 अब्जाधीश
By admin | Published: February 27, 2017 11:50 AM2017-02-27T11:50:56+5:302017-02-27T13:59:05+5:30
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये 820 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये 820 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या रिपोर्टनुसार मुंबईमध्ये 46 हजार कोटयधीश आणि 28 अब्जाधीश राहतात. संपत्तीमध्ये मुंबई पाठोपाठ दिल्ली दुस-या तर, बंगळुरु तिस-या स्थानावर आहे.
दिल्लीची एकूण संपत्ती 450 अब्ज डॉलर असून, 23 हजार कोटयधीश आणि 18 अब्जाधीश दिल्लीमध्ये राहतात. बंगळुरुमध्ये 7700 कोटयधीश आणि 8 अब्जाधीश राहतात. त्याखालोखाल हैदराबादचा क्रमांक लागतो. हैदराबादची एकूण संपत्ती 310 अब्ज डॉलर्सची आहे.
पुण्यामध्ये 180 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 4500 कोटयधीश आणि 5 अब्जाधीश पुण्यामध्ये राहतात. डिसेंबर 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 2 लाख 64 हजार कोटयधीश आणि 95 अब्जाधीश आहेत.