भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 12:22 PM2019-10-22T12:22:24+5:302019-10-22T12:25:07+5:30

बीड मतदारसंघात भावनिक राजकारणाला मोठा वाव आहे. परंतु, परळीत दोन्ही उमेदवारांनी आपापली बाजू मांडून जनताचं निर्णय घेईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांनाही भावनिकतेच्या मुद्दाचा लाभ होणार असं चित्र आहे.

Munde sisters-brother fighting curiosity increased because of sentimentality! | भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली !

भावनिकतेमुळं मुंडे बहिण-भावामधील लढतीची चुरस अजुनच वाढली !

Next

मुंबई - महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या परळी मतदार संघातील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात येथील निवडणूक भावनिकतेवर आली होती. यामुळे सुरुवातीला पंकजा मुंडेंना यांचा फायदा होणार असं वाटलं होतं. परंतु, धनंजय मुंडे यांनाही मतदारसंघात सहानुभुतीची लाट तयार करण्यात यश मिळवले. त्यामुळे परळीतील लढत आणखीच चुरशीची झाली आहे.

केज मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे यांनी सभा घेतली होती. त्यात त्यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात मोठा वाद झाला होता. धनंजय यांनी बहिणीविषयी अपशब्द काढल्याची प्रतिक्रिया येऊ लागली. त्यातच पंकजा मुंडे यांना सभेत भोवळ आल्याने धनंजय मुंडे  चुकलेच असा मॅसेज मतदारांमध्ये गेला होता. धनंजय मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत आपण कार्यकर्त्यांना उद्देशून बोलल्याचे सांगितले.  

दरम्यान धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यातच सोशल मीडियावर धनंजय मुंडे यांना समोर्ट करणारी मोहीम सुरू करण्यात आली होती. याला मोठा प्रतिसादही मिळाला. एंकदरीत परळीत भावनिकतेचे राजाकरण सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

बीड मतदारसंघात भावनिक राजकारणाला मोठा वाव आहे. परंतु, परळीत दोन्ही उमेदवारांनी आपापली बाजू मांडून जनताचं निर्णय घेईल अशी भूमिका घेतली. त्यामुळे दोघांनाही भावनिकतेच्या मुद्दाचा लाभ होणार असं चित्र आहे. भावनिकतेच्या मुद्दावरून एकतर्फी वाटणारी निवडणूक आता पुन्हा एकदा चुरशीची झाली आहे.

 

Web Title: Munde sisters-brother fighting curiosity increased because of sentimentality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.