महापालिका : ५४

By admin | Published: February 22, 2017 02:13 PM2017-02-22T14:13:10+5:302017-02-22T14:13:10+5:30

महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला.

Municipal: 54 | महापालिका : ५४

महापालिका : ५४

Next

महापालिका : ५४ $
$अमरावती : महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेतील ८६ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांनी शिस्तीत रांगा लावून मतदान केले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदानकेंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदारांनी मतदान केले.
सन २०१२ ला सुद्धा सरासरी ५४ टक्के मतदार झाले होते. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानानंतर ६२७ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. गुरूवार २३ फेब्रुवारीला येथिल विभागीय क्र ीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रात बसून मतदारांना धमकावण्याचा प्रकार उघड झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी युवा स्वाभिमान कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने मतदारांना एकाच वेळी चार जणांना मतदान करावे लागले. अ,ब,क,ड हा क्रम चुकल्याने काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने मंगळवारी २२ प्रभागातील ८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. (प्रतिनिधी)
मोरय्यांना बाहेर काढले
४राजापेठ प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवार जयश्री मोरय्या या मतदानकें द्राच्या आवारात बसून मतदारांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. अंबिकानगरस्थित महापालिकेच्या हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
मतदारयादीत नाव सापडेना
४यंदाची सार्वत्रिक निवडणूक चारसद्स्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. सन २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागात घेण्यात आली. या ४३ प्रभागांचे यंदा २२ प्रभागात विलिनीकरण करण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येसोबतच मतदारांची संख्या वाढली. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली. अनेकांना त्यांची नावे मतदारयादीत सापडू शकली नाहीत. तर अनेकांची नावे लगतच्या प्रभागामध्ये दिसून आल्याने मतदारांची वेळेवर धावाधाव झाली.

Web Title: Municipal: 54

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.