नगरसेवकांना पालिकेच्या बोधचिन्हाचे बिल्ले

By admin | Published: August 4, 2016 04:50 AM2016-08-04T04:50:00+5:302016-08-04T04:50:00+5:30

नगरसेवकांची स्वतंत्र ओळख होऊन त्यांचा सन्मान राखला जावा, यासाठी महापालिकेचे बोधचिन्ह असलेले बिल्ले तयार करण्यात आले आहेत.

Municipal Bankers' Insignia Badges | नगरसेवकांना पालिकेच्या बोधचिन्हाचे बिल्ले

नगरसेवकांना पालिकेच्या बोधचिन्हाचे बिल्ले

Next


मुंबई : नगरसेवकांची स्वतंत्र ओळख होऊन त्यांचा सन्मान राखला जावा, यासाठी महापालिकेचे बोधचिन्ह असलेले बिल्ले तयार करण्यात आले आहेत. या या बिल्ल्यांचे महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते तसेच उपमहापौर अलका केरकर व आयुक्त अजय मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात सर्वपक्षीय गटनेत्यांना वितरण करण्यात आले. पालिकेच्या सर्व नगरसेवक/नगरसेविकांना हे बिल्ले वितरीत करण्यात येणार आहेत.
विधानसभा व विधान परिषद सदस्यांना सभागृहात सहज प्रवेश मिळावा, त्यांचा सन्मान राखला जावा म्हणून शासनाने त्यांना बिल्ले दिले आहेत. याच धर्तीवर महापालिकेने हे बिल्ले तयार केले आहेत. महापालिका सदस्यांना महापालिकेचे बोधचिन्ह किंवा प्रतिकृती असलेला बिल्ला देण्याबाबत समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी गटनेत्यांचा बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला सर्व गटनेत्यांनी एकमुखी मंजुरी दिल्यानंतर जनसंपर्क विभागाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Bankers' Insignia Badges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.