पालिका आयुक्तांचा दरारा संपला

By admin | Published: October 17, 2016 02:43 AM2016-10-17T02:43:32+5:302016-10-17T02:43:32+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम राबवून शहरातील सर्व रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त केले

The municipal commissioner ended the crack | पालिका आयुक्तांचा दरारा संपला

पालिका आयुक्तांचा दरारा संपला

Next


नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम राबवून शहरातील सर्व रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त केले होते. पण गत दोन महिन्यांमध्ये आयुक्तांचा दरारा कमी झाला असून फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ अडविले आहेत.
महापालिकेच्या वाशी, कोपरखैरणे व घणसोली विभाग कार्यालयासाठी वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. या विषयावर चर्चा करताना शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांची स्थिती गंभीर झाली असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. ऐरोलीमधील अनेक रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी अडविले असल्याचे निदर्शनास आणून दिले. उपआयुक्त सुहास शिंदे यांनी फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचे सांगितले. यावर सभापतींनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. शहरात सर्वत्र फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. यापूर्वी केलेली कारवाई व्यर्थ गेली असल्याचे सांगितले. विभाग अधिकारी व्यवस्थित काम करत नसल्याचेही सांगितले.
आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेले अतिक्रमणही हटविले होते. अनेक फेरीवाल्यांनी स्वत:हून व्यवसाय बंद केले होते. पण दोन महिन्यांतच आयुक्तांचा दरारा कमी झाल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे.
एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोड भाजी व फळ विक्रेत्यांनी अडविला आहे. कोपरखैरणे सेक्टर १५ मध्ये मुख्य रोड अडवून व्यवसाय सुरू आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन, सानपाडा, वाशी, ऐरोली, सीवूडमध्येही अशीच स्थिती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal commissioner ended the crack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.