महापालिकेला मिळाले २२५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 02:05 AM2017-04-03T02:05:51+5:302017-04-03T02:05:51+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षात विविध कर आणि महसुलांद्वारे २२०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले

Municipal Corporation got 2250 crore | महापालिकेला मिळाले २२५० कोटी

महापालिकेला मिळाले २२५० कोटी

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षात विविध कर आणि महसुलांद्वारे २२०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एलबीटी १३०० कोटी, मिळकत करातून ३१६ कोटी, बांधकाम परवानगीद्वारे २६१ कोटी, पाणीपट्टीतून ३२ कोटी अशा करांतून महापालिकेला २ हजार २६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एलबीटीवगळता अन्य कोणत्याही विभागाचे उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. एलबीटीचे एक हजार ३५० कोटींचे उद्दिष्ट होते. एक हजार ३९३ कोटी उत्पन्न मिळाले आहे. एकशे एक टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सुधारित अंदाजपत्रकात एक हजार ३९० कोटींचा उल्लेख होता. प्रत्यक्षात एलबीटीद्वारे पालिकेस एक हजार ३९३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकरातून महापालिकेस ३१६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. पालिकेला ४०० कोटी अपेक्षित होते. मागील वर्षी ४११ कोटींंचा भरणा झाला होता. त्याचबरोबर साठ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली होती. त्यांपैकी १२ सील करण्यात आल्या. जप्तीच्या कारवाईमुळे नागरिकांनी मिळकतकर मोठ्या प्रमाणात भरला आहे.
जकातीचा आलेख वर्षागणिक उंचावणारा होता. मात्र, जकातीला समर्थ पर्याय समजल्या जाणाठया एलबीटीमुळे उत्पन्नात पहिल्या वर्षी घट झाली ; तर दुसठया वषार्पासून वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनात आनंदाचे वातावरण आहे. वंष्ठपनी खाते तपासणी, मुद्रांक शुल्क वगळता एलबीटी उत्पन्नात निव्वळ ९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एलबीटीची अंमलबजावणी झाल्यापासून महापालिकेच्या इतिहासातील हे सर्वोच्च उत्पन्न आहे. या आर्थिक सुबत्ततेचा अनुकूल परिणाम महापालिकेच्या विकास कामांवर होणार आहे. महापालिकेला मुद्रांक शुल्कातील एक टक्के वाटा म्हणून चालु आर्थिक वर्षात १०५ कोटी ५५ लाख रुपये मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात निवासी बांधकामांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)
३ कोटी पाणीपट्टी वसूल झाली. तीस हजारांच्या वर थकबाकी असणाऱ्या तीन हजार थकबाकीदारांना नोटीस बजावल्या होत्या; तर १६० नळजोड तोडले. यामध्ये थकबाकी ही २८ कोटी २७ लाख एवढी होती. त्यांपैकी २३ कोटी ७६ लाखांची वसुली झाली आहे.
बांधकाम परवानगीद्वारे २६१ कोटीचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक वसुली वाकडमधून ७० कोटी झाली. रावेत ३०, रहाटणी २३, पिंपळे गुरव २२, पिंपरी १८, थेरगाव १७, मोशी-बोऱ्हाडेवाडी २५, आकुर्डी चार कोटी रूपये उत्पन्न मिळाले.मुदत ठेव व्याज व इतर व्याजातून ४५ कोटी, रस्ता दुरुस्ती व अनुदानातून ७३, नगररचना विभाग ८२, आकाशचिन्ह परवाना विभागातून ४२, भूमी आणि जिंदगी विभागातून १५ आणि इतर ४७ कोटी उत्पन्न मिळाले.
महिनाएलबीटीमुद्रांक सरकारीएकूण
शुल्क अनुदानउत्पन्न कोटीत
एप्रिल५१.७८७.६५००५९.४३
मे४४.९२८.६११२३.८८१७७.४१
जून३९.६५११.०४६१.९४११२.६३
जुलै४६.५०९.२५६१.९४११७.६९
आॅगस्ट४७.७३९.४०६१.९४११९.०७
सप्टेंबर४८.९४ ८.७९६१.९४११९.६७
आॅक्टोबर४८.१०१६.१५६१.९४१२६.१९
नोव्हेंबर५१.९०७.५२०००५९.४२
डिसेंबर४४.९९९.७३१२३.८८१७८.६०
जानेवारी४६.७६७.१५२८.८६८२.७७
फेब्रुवारी५२.१३६.६४०००५८.७७
मार्च५०.९९०००१२७.२९१७८.२८
एकुण५७४.३९ १०१.९३ ७१३.५१ १३८९.९३

Web Title: Municipal Corporation got 2250 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.