मरीन ड्राईव्हवरील तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे पालिकेचे आदेश
By admin | Published: June 14, 2016 02:26 PM2016-06-14T14:26:30+5:302016-06-14T14:26:30+5:30
मरीन ड्राईव्हवर बसवण्यात आलेलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 14 - मरीन ड्राईव्हवर बसवण्यात आलेलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं मेटल आर्ट पीस हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. आरपीजी आर्ट फाउंडेशनने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ मरिन ड्राईव्हवर मेटल आर्ट पीस उभारले होते. मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असून 24 तासांत ही वास्तू हटवण्यास सांगितलं आहे.
आरपीजी आर्ट फाउंडेशनने 24 तासांत ही वास्तू हटवली नाही तर कारवाई करण्याचा इशारादेखील महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई हेरिटेज संवर्धन समितीने यापुर्वीही आरपीजी फाऊंडेशनला नोटीस बजावली होती. मात्र नोटीशाचं पालन न केल्याने महापालिकेकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.