महापालिका टोचणार रेल्वे प्रशासनाचे कान

By admin | Published: August 6, 2016 05:19 AM2016-08-06T05:19:15+5:302016-08-06T05:19:15+5:30

गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली.

The municipal corporation will hear the railway administration's ears | महापालिका टोचणार रेल्वे प्रशासनाचे कान

महापालिका टोचणार रेल्वे प्रशासनाचे कान

Next


मुंबई : गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईची जीवनवाहिनी विस्कळीत झाली. अनेक भागांमध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे रेल्वे सेवेला ब्रेक लागला. पावसाळ्यापूर्वी रेल्वे रुळालगतचे छोटे नाले साफ करण्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही दरवर्षीप्रमाणे यंदा हेच चित्र असल्याने पालिका आता रेल्वेचे कान टोचणार आहे.
गुरुवारी रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पालिकेचे दावे फोल ठरवत सखल भाग पाण्याखाली गेले. मात्र पाणी साठल्याचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला. विशेषत: मध्य रेल्वेची वाहतूकही काही तासांसाठी ठप्पच होती. सायन, कुर्ला, माटुंगा, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद बंदर येथील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते.
या प्रकरणाची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील आपत्कालीन नियोजनाची जबाबदारी पालिकेकडे आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोट्या नाल्यांच्या साफसफाईसाठी पालिका रेल्वेला ठरावीक रक्कम देत असते. मात्र वारंवार सूचना देऊनही रेल्वे हे छोटे नाले साफ केल्याचा भास निर्माण करते. प्रत्यक्षात पावसाळ्यात रेल्वेच्या साफसफाईची पोलखोल होत असल्याची नाराजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.
>पालिका पाठवणार रेल्वे प्रशासनाला पत्र
पालिका प्रशासन रेल्वे प्रशासनाला या प्रकरणी खरमरीत पत्र लिहिणार आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्याची नोंद घेण्यात आली आहे. ही निरीक्षणे पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. या वृत्ताला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

Web Title: The municipal corporation will hear the railway administration's ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.