मनपा उपायुक्ताच्या भावाने दिली नगरसेवकाला ‘ठोकण्याची’धमकी

By Admin | Published: May 21, 2017 02:33 PM2017-05-21T14:33:08+5:302017-05-21T14:33:08+5:30

महापालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांचे भाऊ मंगेश निकम यांनी रविवारी शिवसेनेचे माजी सभागृहनेता तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून चक्क ‘ठोकण्याची’धमकी

The Municipal Corporation's Deputy Commissioner said, "to stop the corporator." | मनपा उपायुक्ताच्या भावाने दिली नगरसेवकाला ‘ठोकण्याची’धमकी

मनपा उपायुक्ताच्या भावाने दिली नगरसेवकाला ‘ठोकण्याची’धमकी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 21 - महापालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांचे भाऊ मंगेश निकम यांनी रविवारी शिवसेनेचे माजी सभागृहनेता तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून चक्क ‘ठोकण्याची’धमकी दिली. यापुढे माझ्या भावाला त्रास दिल्यास ‘ठोकून’काढल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भीत इशाराही दिला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, नगरसेवक जंजाळ यांनी त्वरीत पोलीस ठाणे गाठून मंगेश निकमविरुद्ध तक्रार दिली. पोलीसांनीही गुन्हा नोंद केला.

शनिवारी महापालिकेची नियमीत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिक्रमण हटाव विभागाच्या कामकाजावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या विभागाचे प्रमुख उपायुक्त रविंद्र निकम यांची त्वरीत उचलबांगडी करावी अशी मागणीही महापौरांकडे करण्यात आली. महापौर बापु घडामोडे यांनीही त्वरीत प्रशासनाला निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागाचा पदभार काढण्याचा आदेश दिला. महापालिकेतील सर्वोच्च सभागृहाने निर्णय घेतल्यानंतर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही तत्परता दाखवत निकम यांच्याकडील अतिक्रमण हटाव विभागचा पदभार काढून तांत्रिक कक्षप्रमुख एम. बी. काझी यांच्याकडे सोपविला. सर्वसाधारण सभेत निकम यांच्याविरोधात निर्णय गेल्याने त्यांनी स्वत:च हास्यकल्लोळ करीत टेबल वाजवून स्वागत केले होते. या कृतीवरही नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी तिव्र आक्षेप घेतला होता.
 
दरम्यान, रविवारी जंजाळ आपल्या कार्यालयात बसलेले असताना त्यांच्या मोबाईलवर उपायुक्त निकम यांचा भाऊ मंगेश निकम याने फोनवर माझ्या भावाला अजिबात त्रास द्यायचा नाही, नाही तर मी ‘ठोकून’देईन असे सांगितले. जंजाळ यांनी अत्ताच ये म्हणताच वेळ पडल्यावर येईनही असा इशारा दिला. जंजाळ यांनी मोबाईलचे संभाषण पोलीसांना एकवले. त्यानंतर रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Web Title: The Municipal Corporation's Deputy Commissioner said, "to stop the corporator."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.