महापालिका अभियंत्यांची बिल्डरांसोबत दारूपार्टी

By admin | Published: February 6, 2017 01:23 AM2017-02-06T01:23:06+5:302017-02-06T01:23:06+5:30

वसई विरार महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेका अभियंते अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत दारू पिऊन बेधुंद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे

The municipal engineer's builders will have ammunition | महापालिका अभियंत्यांची बिल्डरांसोबत दारूपार्टी

महापालिका अभियंत्यांची बिल्डरांसोबत दारूपार्टी

Next

वसई : वसई विरार महापालिकेत ठेका पद्धतीवर काम करणारे ठेका अभियंते अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत पार्टीत दारू पिऊन बेधुंद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सुट्टी असतानाही महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी १२ अभियंत्यांना निलंबित केले.
स्वरूप खानोलकर नावाच्या पालिकेतील ठेका अभियंत्याच्या वाढदिवसानिमित्त २४ जानेवारीला वसईच्या एका रिसॉर्टमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत स्वरूप खानोलकर (मुख्य अभियंता : अनधिकृत बांधकाम) यांच्यासह नरेंद्र संखे, योगेश सावंत, रोशन भागात, केयूर पाटील, प्रवीण मुलीक, निनाद सावंत, कौस्तुभ तामोरे, नीलेश मोरे, इंद्रजीत पाटील, परमजीत वर्तक, युवराज पाटील यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरासोबत मद्यधुंद नाच केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे येथे फटाक्यांची आतशबाजी, डीजे, विदेशी मद्य अशी धूमधाम होती. वसईच्या समुद्रकिनारी रात्री उशिरापर्यंत ही जंगी पार्टी सुरू होती.
महापालिकेत कायमस्वरूपी अधिकारी असताना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त लोखंडे यांनी ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या खानोलकर यांच्याकडे दिले होते. खानोलकर यांच्या अहवालानंतर कारवाई केली जात होती. कायमस्वरूपी अधिकाऱ्यांना खानोलकर यांच्या हाताखाली काम करावे लागत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. तर दुसरीकडे खानोलकर आणि नरेंद्र संखे यांच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त केला जात होता. या पार्टीमुळे ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या अभियंत्यांचे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत असलेले साटेलोटे उजेडात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The municipal engineer's builders will have ammunition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.