महापालिकेच्या सुविधा आॅनलाइन

By admin | Published: June 27, 2016 02:00 AM2016-06-27T02:00:23+5:302016-06-27T02:00:23+5:30

नागरिकांना सर्व सुविधा सहज उलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Municipal facilities online | महापालिकेच्या सुविधा आॅनलाइन

महापालिकेच्या सुविधा आॅनलाइन

Next


नवी मुंबई : नागरिकांना सर्व सुविधा सहज उलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील ७ ते ८ महिन्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन केल्या जातील, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाअंतर्गत नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये दौऱ्याचे आयोजन केले होते. पाऊस पडत असतानाही नागरिकांनी आयुक्तांशी संवाद साधण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांनी नाले, पार्किंग, रस्ते, गटारे, विद्युत व्यवस्था, उद्यान देखभाल, अनधिकृत बांधकामे या विषयीच्या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. या समस्या पुढील ७ ते १५ दिवसांमध्ये सोडविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पुढील ७ ते ८ महिन्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा आॅनलाइन उपलब्ध होणार आहेत. वाशीमधील अरेंजा कॉर्नर ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. यापुढे एक तासाला १०० रुपये शुल्क आकारले जाईल, असे मत व्यक्त केले.

Web Title: Municipal facilities online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.